advertisement

Shocking News : उल्हासनगरात काय चाललंय?;एका वर्षापूर्वीच्या घटनेमुळे अख्ख्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न

Last Updated:

Family Beaten For Loan Repayment : उल्हासनगरमध्ये 50 हजार रुपयांच्या कर्जावर अडीच लाखांची मागणी करत कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हिललाइन पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18
News18
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये सावकारीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ 50 हजार रुपये घेतल्याच्या बदल्यात तब्बल अडीच लाख रुपयांची मागणी करत कुटुंबाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिललाइन पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगरमध्ये कायद्याचं राज्य आहे की सावकारांचं
मिळालेल्या माहितीनुसार, लता उमाप यांनी काही कामासाठी वर्षभरापूर्वी रमेश आगळे याच्याकडून 50 हजार रुपये दरमहा 10 टक्के व्याजदराने घेतले होते. उमाप कुटुंब नियमितपणे दरमहा व्याजाची रक्कम देत होते. मात्र तरीही सावकाराकडून अधिक पैशांची मागणी सुरूच होती असा आरोप करण्यात आला आहे.
एटीएम कार्ड हिसकावलं, शिवीगाळ केली अन्
26 जानेवारी रोजी दुपारी रमेश आगळे, तरुणा पारचे, रागिता खरात आणि आगळे याची पत्नी यांनी उमाप यांच्या घरी जाऊन गोंधळ घातला. यावेळी उमाप यांच्या सुनेचे कॅनरा बँकेचे एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. 50 हजार रुपये घेतल्याच्या बदल्यात अडीच लाख रुपये द्यावेत अशी मागणी करण्यात आली.
advertisement
सावकारांच्या मुजोरीचा कळस
पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी शिवीगाळ करत उमाप कुटुंबाला मारहाण केली. या घटनेमुळे कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर लता उमाप यांनी हिललाइन पोलिस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे शहरातील अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking News : उल्हासनगरात काय चाललंय?;एका वर्षापूर्वीच्या घटनेमुळे अख्ख्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement