advertisement

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत 24 तासांत हवापालट, 28 जानेवारीला IMD चा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून आता अवकाळी संकट घोंघावत आहे. कल्याण-डोंबिवलीतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
जानेवारी अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. किमान तापमानात 2-4 अंशांची वाढ झाल्यामुळे कडाक्याची थंडी ओसरली असली तरी काही भागात विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची (अवकाळी) शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात दिवसा ढगाळ वातावरण राहून, दुपारच्या वेळी उकाडा जाणवू शकतो. तर 28 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवलीसह इतर भागातील हवमानाची काय स्थिती असेल? जाणून घेऊ.

2/5
कल्याण तालुक्यात काही दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल जाणवत आहेत. आजचे हवामान अंशतः ढगाळ किंवा निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस असेल. हवेतील दमटपणा मध्यम स्वरूपाचा असेल. पावसाची शक्यता नाही.

3/5
जानेवारीच्या अखेरीस डोंबिवलीकर सुखद हवामानाचा आनंद घेऊ शकतील. दिवसभर हवामान कोरडे असून सकाळी उशिरापर्यंत काही ठिकाणी हलके धुके आणि थंडी जाणवेल. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल. बदलत्या हवामानामुळे सकाळी थंडी आणि दुपारी उबदार हवामान, अशा स्थितीत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण गेल्या दोन दिवसांपासून स्थिर हवामान असून बुधवारी आकाश अंशतः ढगाळ राहील. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल 32 अंश सेल्सिअस असेल. सकाळी उशिरापर्यंत हलकी थंडी अनुभवायला मिळू शकते.

5/5
बदलापूर शहरातील हवामान स्वच्छ आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तापमानातील बदलामुळे किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. हवामान कोरडे राहून उष्णता कमी असेल. शहापूर व मुरबाड तालुक्यातील वाऱ्याचा वेग सौम्य असल्याने किमान तापमान 16-18 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 30-32 अंश सेल्सिअस राहील. दिवसा हलके वारे वाहतील त्यामुळे थंडीचा जोर काहीसा कमी राहील.

Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement