अजित पवारांसोबत घातपात? विमानात मुद्दाम बिघाड ठेवला, बड्या वकिलाचं खळबळजनक दावा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सुप्रीम कोर्टाच्या बड्या वकिलाने अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला आहे. ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मुंबईहून बारामतीला गेले होते. पण लँडिंग करत असताना मोठी विमान दुर्घटना घडली. यात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. तांत्रिक कारणामुळे विमान अपघात झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या वकीलानं खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.
अजित पवारांचा विमान अपघात संशयास्पद असून याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही संबंधित वकिलाने केली आहे. नितीन सातपुते असं या वकिलांचं नाव असून ते मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात कार्यरत आहेत. त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत हा संशय व्यक्त केला आहे.
अॅड. नितीन सातपुते काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात संशयास्पद आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि मानवाधिकार आयोगामार्फत याची चौकशी होणे आवश्यक आहे. विमान जाणूनबुजून सदोष ठेवलं होतं की त्यात खरंच काही तांत्रिक बिघाड होता की काही राजकीय कट होता? याची सीबीआयमार्फत चौकशी व्हायला हवी, अशी ॲड. नितीन सातपुते यांनी केली.
advertisement
नेमका अपघात कसा झाला? सगळा घटनाक्रम
एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचलं तेव्हा बारामतीत दाट धुकं होतं. धावपट्टी दिसत नव्हती. बारामती सारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टम उपलब्ध नव्हती. यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरावं लागतं. पण धावपट्टीच दिसत नव्हती. तरीही पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं. आकाशात एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडींग करायला आलं.
advertisement
दुसऱ्यांदा लँडींग करताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता. मात्र तसं झालं नाही. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसा, हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजुला गेलं. पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यात पायलटला अपयश आलं आणि पुढच्या ४ ते ५ सेकंदात विमानाचा मोठा स्फोट घडून अपघात झाला.
ज्या विमानतळावर ILS सिस्टमची सुविधा नसते, अशा विमान तळावर वैमानिकांना आपल्या डोळ्यांनी पाहून धावपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो. पण सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं असल्याने वैमानिकाला हा अंदाज घेता आला नाही. पहिलं लँडींग फसल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. पण यात अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.
advertisement
अपघातापूर्वी पायलटने MAYDAY कॉल केला होता. DGCA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील विमान तळ Table Top Runway प्रकारचं आहे. हे विमान धावपट्टीवर येत असताना यशस्वी लँडींग होईल असं वाटलं होतं. मात्र जमीनीपासून १०० फूट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं. विमान धावपट्टीवर पोहचण्याआधीच जमिनीला धडकलं. यानंतर मोठा आवाज आला आणि चार ते पाच स्फोट घडले. या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने विमानतळाच्या दिशेनं धाव घेतली. मात्र आगीच्या ज्वाळा प्रचंड असल्याने कुणालाही वाचवता आलं नाही.
advertisement
विमान अपघातात कुणा-कुणाचा मृत्यू झाला?
खासगी VSR कंपनीचे विमान
एकूण प्रवासी 05
1. माननीय अजित दादा पवार साहेब
2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
4. कॅप्टन संभवी पाठक
5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 12:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांसोबत घातपात? विमानात मुद्दाम बिघाड ठेवला, बड्या वकिलाचं खळबळजनक दावा










