Ajit Pawar Plane Crash: अनुभवी हातही टेकले! शांभवी पाठक आणि कॅप्टन सुमित यांच्याकडे दांडगा अनुभव, मग 'लिअरजेट ४५'ने दगा कसा दिला?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या हृदयद्रावक अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांनी आपला जीव गमावला. या विमानाचे नियंत्रण अनुभवी कॅप्टन सुमित आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांच्याकडे होते. या भीषण दुर्घटनेत या दोन्ही वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
बुधवार, २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक अत्यंत भीषण आणि काळा अध्याय ठरला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला असून, या हृदयद्रावक घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
advertisement
फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक या २०२२ पासून 'व्हीएसआर व्हेंचर्स' (VSR Ventures) कंपनीत कार्यरत होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर २०१८-१९ मध्ये त्यांनी न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पायलट अकादमीतून विशेष प्रशिक्षण घेतले होते. एक अत्यंत हुशार आणि जिद्दी वैमानिक म्हणून त्यांची ओळख होती.
advertisement
advertisement
जमिनीवर आदळताच विमानाचा चक्काचूर झाला आणि विमानाने क्षणात भीषण पेट घेतला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, कॅप्टन सुमित, शांभवी पाठक आणि पिंकी माली या पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या पाचही जणांच्या मृत्यूची पुष्टी केली असून विमानाचे अवशेष पूर्णपणे जळून राख झाले आहेत. डीजीसीएने या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
advertisement
advertisement
हा भीषण अपघात सकाळी ८:४५ ते ९:१५ च्या सुमारास घडला. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि जनसभांना संबोधित करण्यासाठी निघाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंगचा प्रयत्न करत असताना विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे विमान धावपट्टीवर न उतरता जवळच्याच एका शेतात कोसळले.









