advertisement

अजित पवार कोणत्या विमानात प्रवास करत होते? जाणून घ्या प्लेनच्या डिटेल्स 

Last Updated:

Bombardier Learjet 45XR: महाराष्ट्राचे डिप्टी सीएम अजित पवारांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालंय. सकाळी 8 वाजून 45 मिनिटांना अजित पवारांच विमान अचानक क्रॅश झालं.

अजित पवार
अजित पवार
Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर नेता अजित पवारांचा विमान अपघातता दुर्दैवी निधन झालं आहे. आज बुधवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांना त्यांचं विमान अचानक क्रॅश झालं. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान अजित पवार प्रवास करत असलेलं विमान हे कोणत्या कंपनीचं होतं.  विमानाची उडण्याची क्षमता किती होती आणि विमानात किती प्रवासी बसण्याची व्यवस्था होती. या सर्वच प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
विमानाशी संबंधीत आवश्यक डिटेल्स 
विमान कोणतं होतं Learjet 45
हे विमान कोणत्या कंपनीने बनवलं होतं : Bombardier
विमान कंपनीचं ऑपरेटर : VSR
एयरक्राफ्ट टाइप : Learjet 45
एयरक्राफ्ट रजिस्ट्रेशन: VT-SSK
Learjet 45 हे बॉम्बार्डियर एरोस्पेस (1998-2009) द्वारे निर्मित एक लोकप्रिय, वेगवान, सुपरहलके आणि मध्यम आकाराचे बिझनेस जेट आहे. या विमानात साधारणपणे 8-9 प्रवासी बसू शकतात आणि त्याची रेंज 2000+ नॉटिकल मैल आहे. त्याच्या अपवादात्मक कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले, ते 464 नॉट्स (534 mph) पर्यंतचा वेग आणि 51,000 फूट उंचीपर्यंत पोहोचू शकते. 2004 मध्ये, Learjet 45XR ही एक अपग्रेडेड व्हर्जन सादर करण्यात आली, जी सुधारित वेग आणि कार्यक्षमता देते.
advertisement
ते विमान कोणत्या कंपनीचे होते आणि त्यात कोण होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान व्हीएसआर या खाजगी कंपनीचे होते.  M/S VSR Ventures Pvt Ltd,  ही दिल्लीस्थित खाजगी विमान कंपनी आहे. ही कंपनी विमान भाड्याने देते आणि विमान सल्लागार म्हणूनही काम करते. 14 सप्टेंबर 2023 रोजी याच कंपनीचे एक विमान मुंबई विमानतळावर कोसळले होते.
advertisement
अपघाताच्या वेळी विमानात एकूण 5 लोक होते. ज्यामध्ये माननीय अजित पवार, मुंबई PSO HC विदिप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन सांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडेंट पिंकी माळींचा समावेश होता. विमान सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी टेक-ऑफ झालं होतं आणि बारामतीमध्ये लँडिंगचा वेळ वाजून 50 मिनिटे होता. मात्र लँडिंगच्या वेळी अचानक प्लेन क्रॅश झालं.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
अजित पवार कोणत्या विमानात प्रवास करत होते? जाणून घ्या प्लेनच्या डिटेल्स 
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement