MI vs RR : मुंबई इंडियन्स राजस्थानमध्ये 11-11 ओव्हरचा सामना...पण मॅच किती वाजता सुरू होणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मागच्या दोन तासापासून गुवाहाटीच्या मैदानावर पाऊस पडस असल्याने हा सामना सूरूच होऊ शकला नाही. पण आता जवळपास 5- ओव्हरचा सामना होण्याची शक्यता आहे.
Mumbai Indians vs Rajasthan Royal : आयपीएलमध्ये आज गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिएमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. पण मागच्या दोन तासापासून गुवाहाटीच्या मैदानावर पाऊस पडस असल्याने हा सामना सूरूच होऊ शकला नाही. पण आता जवळपास 5- ओव्हरचा सामना होण्याची शक्यता आहे. असे जर झाले तर किती वाजता मॅच सुरु होणार आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात संध्याकाळी 7 वाजता टॉस होणे अपेक्षित होते. पण पावसामुळे टॉसच होऊ शकला नाही. आता जवळपास दोन तासाचा कालावधी उलटून गेला आहे. तरी देखील टॉस झालेला नाही.मैदानात प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे प्रचंड अडचणी येत आहेत.
मैदान सतत पाऊस पडत असल्यामुळे सामन्याची वेळ देखील कमी होत चालली आहे. त्यात 8.40 सामन्याचे ओव्हर घटण्यास सूरूवात झाली आहे.त्याचसोबत आता सामन्याचा कटऑफ टाईमही जाहीर करण्यात आला आहे. 10.56 हा सामन्याचा कट ऑफ टाईम असणार आहे.जर या वेळेच्या नंतर सामना सूरू झाला तर 5-5 ओव्हरचा सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
सध्या पाऊस थांबल्याचे चित्र आहे. अंपायर देखील मैदानात आले आहेत आणि क्युरेटरशी चर्चा करत आहेत.तसेच ग्राऊंडस्फाफने देखील मैदानावरील कव्हर्स हटवण्यास सूरूवात केली आहे. ही गोष्ट पाहता मैदानात लवकरच टॉस होऊन सामन्याला सूरूवात होण्याची शक्यता आहे. जर आता लगेचच सामना सूरू झाला तर जास्तीत जास्त 10 ओव्हरचा सामनाही खेळवण्याची शक्यता आहे.याबाबत लवकरच अपडेट मिळणार आहेत.
advertisement
मैदानावरील कव्हर काढताना अनेक ठिकाणी पाण्याची डबके बनली आहेत. ही बाब चांगली नाही. त्यामुळे मैदानाची खेळपट्टी सुकवण्यासाठी मैदान कर्मचाऱ्यांना आणखीच जास्त वेळ लागेल.
पण राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग आणि सपोर्ट स्टाफमधील अनेक सदस्य आधीच मैदानावर उपस्थित आहेत. अखेर, झाकणांवर साचलेले पाणी काढून टाकण्यासाठी 'सुपर सोपर्स' फिरवले जात आहेत," अशी माहिती आयुषने दिली आहे.
advertisement
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार 21.55 ला टॉस पार पडला आहे. हा टॉस मुंबईने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजीला उतरणार आहे. सामन्याला 10.10 वाजता सूरूवात होणार आहे. हा सामना 11-11 ओव्हरचा पार पडणार आहे.त्यात 3.2 ओव्हरचा पॉवरप्ले असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 9:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs RR : मुंबई इंडियन्स राजस्थानमध्ये 11-11 ओव्हरचा सामना...पण मॅच किती वाजता सुरू होणार?









