MI vs RR : सुर्यवंशी-जयस्वालच्या जोडीने मुंबईची झोप उडवली, 11 ओव्हरमध्ये किती धावांचं आव्हान?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने आक्रामक खेळी केली होती. ही खेळी पाहून मुंबई इंडियन्सची झोप उडाली आहे. कारण दोघांनी मिळून मुंबई इंडियन्ससमोर डोंगराएवढ आव्हान ठेवलं आहे.
Mumbai Indians vs Rajasthan Royals : आयपीएलमध्ये आज पावसामुळे राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 11 ओव्हरचा सामना पार पडला आहे. हा सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने आक्रामक खेळी केली होती. ही खेळी पाहून मुंबई इंडियन्सची झोप उडाली आहे. कारण दोघांनी मिळून मुंबई इंडियन्ससमोर डोंगराएवढ आव्हान ठेवलं आहे.
हार्दिक पांड्याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजीला होती. यावेळी जयस्वालने पहिल्याच बॉलपासून प्रहार करायला सूरूवात केली होती. यावेळी जयस्वालने दीपक चहरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडत 22 धावा काढल्या होत्या.
त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला बुमराह आणि वैभव सूर्यवंशीचा आमना सामना झाला.ज्यामध्ये वैभवने पहिल्याच बॉलला बुमराहला सिक्स मारलात.त्यानंतर त्याने बुमराहचा आदर ठेव एक धाव काढली.त्यानंतर पुन्हा फलंदाजीला आल्यावर आणखी एक सिक्स मारला.अशाप्रकारे वैभवने बुमराहच्या ओव्हरला 13 धावा काढल्या.
advertisement
त्यानंतर यशस्वी जयस्वालने आक्रामक खेळी करत ट्रेंट बोल्टला दोन बॉल दोन सिक्स ठोकले. त्याच्यासोबत वैभवने देखील त्याला सिक्स मारला. हार्दिक पांड्याच्या ओव्हरला दोघांची बॅट शांत राहिली. त्यानंतर वैभवने शार्दुल ठाकूरला पहिल्या बॉलला सिक्स मारला. त्यानतर त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलला तो सिक्स मारताना बाद झाला.
या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 14 बॉलमध्ये 39 धावा केल्या. त्याच्यानंतर ध्रुव जुरेल 2 वर बाद झाला.त्यानंतर रियान पराग 20 वर बाद झाला. राजस्थानकडून सर्वाधिक धावा या यशस्वी जयस्वालने केल्या. जयस्वालने 32 बॉलमध्ये 77 धावांची नाबाद खेळी केली. या बळावर राजस्थानने 11 ओव्हरमध्ये 150 धावा केल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर 151 धावांचे आव्हान असणार आहे.
advertisement
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, एएम गझनफर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 11:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs RR : सुर्यवंशी-जयस्वालच्या जोडीने मुंबईची झोप उडवली, 11 ओव्हरमध्ये किती धावांचं आव्हान?









