Vaibhav Suryavanshi : बुमराहच्या पहिल्याच बॉलला वैभवचा सिक्स, पण कसा मारला? 46000 हजार प्रेक्षकांचा श्वास रोखला, VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच बॉलवर वैभव सूर्यवंशी गगनचुंबी षटकार मारला आहे. हा षटकार पाहून सगळेच शॉक झाले होते. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Vaibhav Suryavanshi vs Jasprit Bumrah : राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला अखेर सूरूवात झाली आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि वैभव सूर्यवंशी आमने सामने आले होते. यावेळी जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच बॉलवर वैभव सूर्यवंशी गगनचुंबी षटकार मारला आहे. हा षटकार पाहून सगळेच शॉक झाले होते. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान वैभव सूर्यवंशीने बुमराहच्या पहिल्याच बॉलला सिक्स कसा मारला?हे जाणून घेऊयात.
खरं तर हा सामना 11-11 ओव्हरचा खेळण्यात येणार असल्याने राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने आक्रामक सुरूवात केली होती. दिपर चहर टाकायला आलेल्या पहिल्याच ओव्हरला जयस्वालने 22 धावा काढल्या.त्यानंतर जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. त्याच्यासमोर वैभव सूर्यवंशी होती.
वैभव सूर्यवंशी बुमराहला कसा खेळेल असा प्रश्न होता.पण वैभवने आल्या आल्या बुमराहच स्वागत केलं. बुमराहच्या पहिल्याच बॉलवर वैभव सूर्यवंशीने षटकार खेचला.त्यानंतर दुसऱ्या बॉलवर वैभवने एक धाव काढली. यानंतर यशस्वीने देखील एक धाव काढली.त्यामुळे वैभव पुन्हा स्ट्राईकवर आला. त्यानंतर त्याने पुन्हा बुमराहच्या पाचव्या बॉलवर सिक्स ठोकला होता. बुमराहच्या या ओव्हरमध्ये 14 ओव्हर काढण्यात आल्या. ज्यातल्या 13 धावा एकट्या वैभव सूर्यवंशीच्या होत्या.
advertisement
🚨JASPRIT BUMRAH SEEN UNHAPPY ON SURYAVANSHI BACK TO BACK HITTING SIX🚨
- Vaibhav Suryavanshi hit 2 Sixes on Jasprit Bumrah over at age of 15 🔥
pic.twitter.com/9MMObvlgQ5
— Sam (@Cricsam01) April 7, 2026
दरम्यान बुमराहसारख्या दिग्गज बॉलरला वैभव सूर्यवंशीने सिक्स कसा मारला? हे जाणून घेऊयात.खरं तर बुमराह त्याच्या ओव्हरची पहिली बॉल नेहमीच स्लोव्हर टाकतो. वर्ल्डकपमध्ये देखील त्याने अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती.पण बुमराहची स्लोव्हर बॉलची ट्रिक त्याला कळताच बुमराहने स्लॉटमध्ये बॉल मिळताच सिक्स ठोकला. पाचव्या बॉल देखील बुमराहने असाच टाकला होता,त्यामुळे वैभवला ही गोष्ट कळताच त्याने दुसरा सिक्स ठोकला.
advertisement
यानंतर वैभव सूर्यवंशीने ट्रेंट बोल्टला देखील सिक्स ठोकला, त्यानंतर शार्दुल ठाकूरला देखील पहिल्याच बॉलवर सिक्स ठोकून त्याच स्वागत केलं. त्यानंतर त्याला एक चौकार आणि षटकार देखील मारला. त्यानंतर शेवटच्या बॉलवर सिक्स मारताना वैभव सूर्यवंशी कॅच आऊट झाला. तिलक वर्माने त्याची कॅच घेतली. वैभव सूर्यवंशी 14 बॉलमध्ये 39 धावा करून बाद झाला.
advertisement
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, एएम गझनफर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 10:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : बुमराहच्या पहिल्याच बॉलला वैभवचा सिक्स, पण कसा मारला? 46000 हजार प्रेक्षकांचा श्वास रोखला, VIDEO










