Iran: 'हा देश संपवू देणार नाही' ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणी नागरिकांच्या कृत्याने जग हळहळलं, VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
शातच इराणमधील लोक मोठ्या संख्येनं आता पुलांवर आणि विज केंद्रावर एकत्र आले आहे. मानवी साखळी करून इराणी लोक आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आली आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष आता या युद्धाकडे लागलं आहे. इराणसाठी आजची रात्र ही शेवटीच रात्र असणार असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच इराणमधील लोक मोठ्या संख्येनं आता पुलांवर आणि विज केंद्रावर एकत्र आले आहे. मानवी साखळी करून इराणी लोक आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आली आहे. हे दृश्य पाहून जगभरात खळबळ उडाली आहे.
इराणमध्ये आजचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा वेगळा ठरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिल्यानंतर शेकडो इराणी लोक रस्त्यावर उतरले आहे. उड्डाणपुल आणि विज केंद्रावर लोक जमा होत आहे. अमेरिकन सैन्य हे इराणच्या पायाभूत सुविधा उद्ध्दवस्त करेल अशी शक्यताा आहे. त्यामुळे जर तेहरानने युद्ध थांबवण्याच्या त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर हा हल्ला अटळ आहे, असं समजलं जात आहे.
advertisement
Iranians gather on bridges and power generation stations across the country to prevent them from being targets of Trump's war crimes.
Follow: https://t.co/B3zXG73Jym pic.twitter.com/yuZUmvoTVf
— Press TV 🔻 (@PressTV) April 7, 2026
इराणमध्ये आता लोक आपल्या देशाचा झेंडा हातात घेऊन विज केंद्र आणि पुलांवर उभे आहेत. अनेक ठिकाणी लोक मानवी साखळी करून उभे आहे. यामध्ये नागरिक, तरुण, कलाकार आणि खेळाडूंचा देखील समावेश आहे, सुप्रीम कौन्सिल ऑफ यूथ अँड अडोलेसंट्सचे सचिव अलीरेझा रहिमी यांनी तरुणांना महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं रक्षण करण्यासाठी मानवी साखळी तयार करण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
Human chain forms on White Bridge in Iran as locals try to shield it from bombing pic.twitter.com/yjuJ6C6qVv
— RT (@RT_com) April 7, 2026
इराणमधील तरुणांना मानवी साखळी करण्याची कल्पना सुचली, त्यामुळे विद्यापीठातील तरुण, कलाकार आणि वेगवेगळ्या संघटनेची लोक आपल्या देशातील वीज केंद्रांभोवती मानवी साखळी करण्यासाठी पुढे आहे. या मोहिमेला "इराणच्या तरुणांची उज्ज्वल भविष्यासाठी मानवी साखळी" असं ठेवण्यात आलं आहे, असं रहिमी सांगितलं.
advertisement
ट्रम्प यांनी काय दिली धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर ट्वीट करून इशारा दिला होता. "आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते आणि ती पुन्हा कधीही उभी राहणार नाही' असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. तसंच गेल्या 47 वर्षांपासून सुरू असलेल्या “खंडणी, भ्रष्टाचार आणि मृत्यूच्या युगाचा” शेवट होईल, असंही ट्रम्प यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराणच्या महान जनतेला आशीर्वाद देतो, असं म्हणत त्यांनी पोस्टचा शेवट केला.
Location :
Delhi
First Published :
Apr 07, 2026 10:31 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran: 'हा देश संपवू देणार नाही' ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणी नागरिकांच्या कृत्याने जग हळहळलं, VIDEO






