advertisement

Yawning : सतत येणाऱ्या जांभईकडे दुर्लक्ष करु नका, केवळ अपुऱ्या झोपेमुळे नाही कदाचित गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Last Updated:

झोपेच्या कमतरतेमुळे जांभई येते असं समजून दुर्लक्ष करत असाल तर याबद्दलच्या संशोधनातून समोर आलेली काही निरीक्षणं नक्की पाहायला हवी. नवीन संशोधनानुसार जांभई येणं हे नेहमीच सामान्य नसतं. बऱ्याच प्रकरणांत, हे आरोग्याच्या गंभीर समस्यांचं लक्षण असू शकतं.

News18
News18
मुंबई : झोप आली असेल किंवा झोपेतून उठल्यावर थोडा वेळ जांभई येते. पण काही वेळा वारंवार जांभई येत असेल तर सावध व्हायला हवं.
झोपेच्या कमतरतेमुळे जांभई येते असं समजून दुर्लक्ष करत असाल तर याबद्दलच्या संशोधनातून समोर आलेली काही निरीक्षणं नक्की पाहायला हवी. नवीन संशोधनानुसार जांभई येणं हे नेहमीच सामान्य नसतं. बऱ्याच प्रकरणांत, हे आरोग्याच्या गंभीर समस्यांचं लक्षण असू शकतं.
जास्त जांभई येणं हे अपस्मार, पक्षाघात किंवा मेंदूतील विकृती यांसारख्या काही मज्जासंस्थेच्या समस्यांशी संबंधित असू शकतं असं वैद्यकीय संशोधनात आढळून आलं आहे.
advertisement
वारंवार जांभई येणं हे फ्रंटल लोब सीझर्सचे म्हणजेच मेंदूच्या पुढच्या भागातील झटक्याचं लक्षण असू शकतं, असं काही तपासणीत आढळून आलं आहे.
मज्जासंस्था - जांभई येणं हे आपल्या ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिमशीही संबंधित आहे. याद्वारे हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि पचन यांसारख्या शरीराच्या अनेक कार्यांवर नियंत्रण ठेवलं जातं. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात आढळून आलेली निरीक्षणं पाहूयात. जास्त जांभई येणं हे या प्रणालीतील असंतुलनाचं लक्षण असू शकतं.
advertisement
जांभईचा संबंध मेंदूच्या तापमान नियमनाशी असू शकतो असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. मेंदूला स्वतःचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तेव्हा जांभई दिल्यानं थंड हवा आत शिरण्यास मदत होते आणि रक्तप्रवाह वाढतो.
पक्षाघाताच्या काही रुग्णांमधे, मेंदूच्या ज्या भागांमधे तापमान-नियंत्रण करणारे भाग प्रभावित झालेले असतात, त्या भागांमधे जांभई अधिक प्रमाणात येत असल्याचं आढळून आलं आहे. ही शरीरासाठीची एक शीतकरण यंत्रणा असू शकते असंही यावरून सूचित होतं. त्यामुळे असा काही बदल आढळला किंवा वारंवार जांभया येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Yawning : सतत येणाऱ्या जांभईकडे दुर्लक्ष करु नका, केवळ अपुऱ्या झोपेमुळे नाही कदाचित गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement