advertisement

Lifestyle Tips : आरोग्य आणि सौंदर्यासाठी सुपर फूड, अंडी करतील शरीराचं पोषण, वजनही करतील कमी, केसही होतील शानदार

Last Updated:

आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हींसाठी अंडी फायदेशीर मानली जातात. अंडी खाल्ल्यानं शरीरावर दृश्य परिणाम दिसून येतात, तर अंडी केसांना लावल्यानं केस अधिक चमकदार होऊ शकतात आणि तुटण्याचं प्रमाण कमी होतं.

News18
News18
मुंबई : अंडी खावीत की नाही हा कायम चर्चेतला विषय. अनेकांना प्रकृतीसाठी पौष्टिक घटक म्हणून अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हींसाठी अंडी फायदेशीर मानली जातात. अंडी खाल्ल्यानं शरीरावर दृश्य परिणाम दिसून येतात, तर अंडी केसांना लावल्यानं केस अधिक चमकदार होऊ शकतात आणि तुटण्याचं प्रमाण कमी होतं.
अंडी म्हणजे प्रथिनं, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी आणि चांगल्या चरबीचा म्हणजे फॅट्सचा एक चांगला स्रोत मानली जातात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज एक अंड खाल्ल्यानं शरीराला आवश्यक प्रथिनं मिळतात, ज्यामुळे स्नायू मजबूत होण्यासाठी, अशक्तपणा कमी होण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
advertisement
अंड्यांमधील पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटण्यास मदत होते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यांच्यासाठी उकडलेली अंडी फायदेशीर ठरतात, कारण त्यात कॅलरीज कमी आणि प्रथिनं भरपूर असतात. नाश्त्यामधे अंडी खाल्ल्यानं दिवसभरात अस्वास्थ्यकर पदार्थ खाणं कमी होण्यास मदत होऊ शकते.
advertisement
अंड्यांचा केसांसाठी उपयोग -
अंड्याचा पांढरा भाग आणि पिवळा भाग दोन्ही केस आणि त्वचेसाठी वापरले जातात. केसांना अंडी लावल्यानं प्रथिनं मिळतात. यामुळे केस अधिक मजबूत आणि चमकदार दिसू शकतात.
काही लोक अंड्याचा पांढरा भाग त्वचेला लावतात, ज्यामुळे त्वचा घट्ट वाटते आणि तेलकटपणा कमी होतो. पण कच्चं अंडं थेट त्वचेवर किंवा केसांवर लावल्यानं काहींना ऍलर्जी किंवा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे, पहिल्यांदाच वापरत असाल, तर आधी पॅच टेस्ट करणं उत्तम ठरेल. महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे ती म्हणजे अंडं लावण्याचे परिणाम बहुतेक करून बाह्य आणि तात्पुरते असतात, तर अंडं खाल्ल्यानं शरीराला आतून पोषण मिळतं.
advertisement
अंडी खाणं हा पोषणाचा अधिक परिणामकारक मार्ग आहे, कारण त्यातून शरीराला आवश्यक प्रथिनं आणि जीवनसत्त्वं थेट मिळतात. सुदृढ शरीर, वजन कमी करण किंवा एकूण आरोग्य सुधारणं हा उद्देश असेल, तर अंडी खाणं फायदेशीर ठरतं.
advertisement
केसांची चमक किंवा त्वचेचा घट्टपणा यासाठी घरगुती उपाय शोधत असाल, तर अंडी हा एक चांगला पर्याय आहे. महत्त्वाचं म्हणजे, आहारात किंवा त्वचेसाठी कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी, आपल्या शरीराच्या गरजा विचारात घेणं आणि त्यादृष्टीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Lifestyle Tips : आरोग्य आणि सौंदर्यासाठी सुपर फूड, अंडी करतील शरीराचं पोषण, वजनही करतील कमी, केसही होतील शानदार
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement