advertisement

Diet Tips : भिजवलेल्या सुक्या मेव्याचे पौष्टिक फायदे, पचन होईल सुलभ, प्रकृतीसाठी उपयुक्त खाऊ

Last Updated:

आयुर्वेदानुसार, भिजवलेला सुका मेवा खाल्ल्यानं पोषक घटकांची कमतरता भरुन निघते आणि पचनक्रिया सुधारते. चरक संहितेनुसार, सुका मेवा भिजवल्यानं त्यातील फायटिक ॲसिडचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे ती पचायला सोपी जातात आणि पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषले जातात.

News18
News18
मुंबई : जेवणाव्यतिरिक्त अन्य पोषक घटक म्हणजे फळं, सुका मेवा. कारण यातून आपल्या आहारात पुरेशी जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळतात.
सुका मेवा खायचं म्हटलं की आजी काय सांगते ते आठवायचं. सुका मेवा कच्चा न खाता, तो भिजवून खाणं अधिक उपयुक्त ठरतं असा ज्येष्ठांचा सल्ला असतो. कारण यामुळे पचन सुलभ होतं. भिजवलेला सुका मेवा अधिक पौष्टिक ठरतो.
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेला सुका मेवा खाल्ल्यानं शरीराला अनेक पोषक घटक मिळतात आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
advertisement
आयुर्वेदानुसार, भिजवलेला सुका मेवा खाल्ल्यानं पोषक घटकांची कमतरता भरुन निघते आणि पचनक्रिया सुधारते. चरक संहितेनुसार, सुका मेवा भिजवल्यानं त्यातील फायटिक ॲसिडचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे ती पचायला सोपी जातात आणि पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषले जातात.
advertisement
बदाम - चरक संहितेनुसार, सकाळी लवकर भिजवलेले बदाम खाल्ल्यानं हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि ते मेंदूसाठी फायदेशीर ठरतं. तसंच ते त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे.
अक्रोड - अक्रोडातील फायबर आणि प्रथिनांमुळे भूक कमी लागते आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे वजन कमी होण्यासाठी आणि तणाव कमी होण्यासाठी लक्षणीय मदत होऊ शकते.
advertisement
मनुका - मनुका उष्ण असतात. त्या भिजवून खाल्ल्यानं कोणतीही समस्या उद्भवत नाही. तसंच, यामुळे शरीरातील रक्ताचा पुरवठा वाढवण्यासही मदत होते.
खजूर - खजूर पाण्यात भिजवून खाल्ल्यानं अनेक आरोग्य समस्या कमी होऊ शकतात. तसंच हृदय आणि मज्जातंतूंच्या समस्या कमी करण्यासाठीही मदत होते.
advertisement
अंजीर - अंजीरामधे अधिक उष्मांक असतो. त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि कर्बोदकं संतुलित प्रमाणात असतात.
काजू - काजूमधे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, हाडांची मजबुती आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी काजू उपयुक्त ठरतात.
शेंगदाणे - भिजवलेले शेंगदाणे केसांसाठी आणि त्वचेसाठी उत्तम असतात. त्यामधे प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diet Tips : भिजवलेल्या सुक्या मेव्याचे पौष्टिक फायदे, पचन होईल सुलभ, प्रकृतीसाठी उपयुक्त खाऊ
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement