Health Tip : जागतिक आरोग्य दिन - तुम्ही आरोग्याची पुरेशी काळजी घेता का ? आरोग्यकारक जीवनशैलीसाठी काय करता ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला तासांची नाही, तर फक्त दहा मिनिटांची गरज आहे. कितीही व्यस्त असलात तरी, दहा मिनिटांचा आरोग्य नियम सहजपणे पाळता येतो. सलग सात दिवस हा नियम पाळलात, तरीही तुम्हाला स्वतःमधे फरक दिसून येईल. यासाठी दिनक्रम बदलण्याची गरज नाही. दिवसातून केवळ दहा मिनिटं निवडा.
मुंबई : वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण प्रकृती चांगली ठेवण्यासाठी अनेक संकल्प करतात. तो उत्साह विशेष टिकत नाही. तब्येतीकडे म्हणावं तसं लक्ष दिलं जात नाही असं वाटत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही.
जीवनशैली एका रात्रीत बदलत नाही. थकवा आणि कंटाळा आला की निश्चय मोडतात. आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला तासांची नाही, तर फक्त दहा मिनिटांची गरज आहे. कितीही व्यस्त असलात तरी, दहा मिनिटांचा आरोग्य नियम सहजपणे पाळता येतो. सलग सात दिवस हा नियम पाळलात, तरीही तुम्हाला स्वतःमधे फरक दिसून येईल. यासाठी दिनक्रम बदलण्याची गरज नाही. दिवसातून केवळ दहा मिनिटं निवडा.
advertisement
या नियमामुळे, मनावर भार पडत नाही आणि दीर्घकाळ त्या सवयी टिकवून ठेवण्यास मदत होते.
दीर्घ श्वसन - पहिल्या दिवशी कुठेही आरामात बसा आणि दहा मिनिटं दीर्घ श्वसन करा. दीर्घ श्वसन फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहे आणि यामुळे मनही शांत होतं.
advertisement
स्ट्रेचिंग - दिवसभर लॅपटॉप किंवा फोनवर वाकून बसल्यामुळे आपले स्नायू कडक होतात. यासाठी दुसऱ्या दिवशी दहा मिनिटं फक्त साधं स्ट्रेचिंग करा. तुमची मान, खांदे आणि कंबर थोडी हलवा. यामुळे शरीर किती हलकं झालं आहे हे तुम्हाला जाणवेल.
फोन बाजूला ठेवा आणि फिरायला जा - तिसऱ्या दिवशी, दहा मिनिटांसाठी फोन बाजूला ठेवा किंवा खोलीतच ठेवा. घराबाहेर पडा आणि फक्त फिरायला जा. कोणत्याही नोटिफिकेशन्सशिवाय घालवलेली दहा मिनिटं मानसिक उत्साहासाठी उत्तम आहेत.
advertisement
आहाराचं थोडं नियोजन - चौथ्या दिवशी, तुम्ही काय खात आहात याचा विचार करा. कोणतेही मोठे बदल करु नका, केवळ उद्याच्या जेवणात एक फळ किंवा वाटीभर सॅलडचा समावेश करायचं ठरवा. या छोट्या नियोजनामुळे तुमची ऊर्जा अनेक पटींनी वाढेल.
advertisement
सकारात्मक विचार - पाचव्या दिवशी, दहा मिनिटं तुमच्या सामर्थ्यांविषयी आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही देव किंवा निसर्गाचे आभारी आहात, त्याबद्दल विचार करा. मन आनंदी असतं, तेव्हा शरीर आपोआप निरोगी होतं.
ताठ बसा, आत्मविश्वास वाढवा- चुकीच्या बसण्याच्या किंवा उभ्या राहण्याच्या पद्धतीमुळे केवळ वेदनाच होत नाहीत, तर व्यक्तिमत्वावरही परिणाम होतो. सहाव्या दिवशी, दहा मिनिटं आरशासमोर ताठ उभं राहण्याचा आणि बसण्याचा सराव करा. हा साधा व्यायाम पाठीच्या कण्यासाठी वरदान आहे.
advertisement
शांत झोप - सातव्या दिवशी, झोपण्याच्या दहा मिनिटं आधी स्क्रीन पाहणं बंद करा. मंद प्रकाशात बसा किंवा पुस्तक वाचा. यामुळे मेंदूला आराम करण्याची वेळ झाली आहे, असा संकेत मिळेल.
या सात दिवसांचं वेळापत्रक आव्हानात्मक नाही, थोडी सवय झाली की तुम्हालाच प्रकृतीत फरक दिसेल.
या वेळापत्रकामधे, कोणताही दबाव किंवा बंधन नाही. हा तुमचा वैयक्तिक प्रवास आहे असं समजून करा, म्हणजे ही दह मिनिटं तुमच्या आयुष्यात मोठा बदल आणू शकतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 5:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tip : जागतिक आरोग्य दिन - तुम्ही आरोग्याची पुरेशी काळजी घेता का ? आरोग्यकारक जीवनशैलीसाठी काय करता ?









