advertisement

Guess Who: कुणी बस स्टँडवर विकले चणे, कुणी हमाल म्हणून राबलं; बॉलिवूड सुपरस्टार्सना पोटासाठी करावी लागलेली नको ती कामं

Last Updated:
Bollywood Superstars Struggle Stories: इंडस्ट्रीत असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात कठोर परिश्रम केले. इतकंच नाही, तर त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर चणे-शेंगदाणे विकावे लागले होते.
1/13
सिनेसृष्टीचे सुपरस्टार्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते त्यांच्या लग्झरी गाड्या, कोट्यवधींचे बंगले आणि त्यांच्यासाठी वेडे होणारे फॅन्स. वरवर हे आयुष्य कितीही आकर्षक वाटत असलं, तरीही त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत नेहमीच दुर्लक्षित राहते.

2/13
इंडस्ट्रीत असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात कठोर परिश्रम केले. इतकंच नाही, तर त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर चणे-शेंगदाणे विकावे लागले होते.

3/13
आज आपण अशा सुपरस्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यापैकी कोणी कधीकाळी बस स्टँडवर चणे विकले, तर कोणी चक्क रेल्वे स्टेशनवर ओझी वाहिली. या सुपरस्टार्सना नशीबाने हे यश मिळालेलं नाही, तर त्यांनी जिद्दीने शून्यातून विश्व निर्माण केलं आहे.

4/13
इंडस्ट्रीचे जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफ यांना वेगळ्या ओळखीची गरज नाही. पण त्यांच्या तारुण्यात घरची परिस्थिती इतकी हालाखीची होती की, त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांनी मुंबईच्या बस स्टँडवर चणे विकले. इतकंच नाही, तर थोड्या पैशांसाठी त्यांनी रस्त्यावर सिनेमाचे पोस्टर चिकटवण्याचंही काम केलं.

5/13
जग्गू दादांना एअर इंडियामध्ये फ्लाइट अटेंडन्ट बनायचं होतं, पण डिग्री नसल्यामुळे त्यांना नकार पचवावा लागला. अखेर एका बस स्टँडवर उभे असतानाच एका जाहिरात कंपनीच्या मालकाची नजर त्यांच्यावर पडली आणि इथूनच त्यांच्या नशिबाला कलाटणी मिळाली आणि कालांतराने बॉलिवूडला मिळाले त्याचे लाडके जग्गू दादा.

6/13
साऊथ इंडस्ट्रीमध्ये देवाच्या स्थानी मानले जाणारे रजनीकांत यांचा सुरुवातीचा काळ अतिशय कठीण होता. त्यांनी आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी कुलीचं काम केलं होतं. पुढे त्यांनी बस कंडक्टर म्हणूनही काम केलं.

7/13
यावेळी त्यांची तिकीट फाडण्याची आणि सिगरेट हवेत उडवण्याची हटके स्टाईल प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आणि इथूनच त्यांच्यासाठी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटची दारं उघडली. आज ते भारतीय सिनेमाचे सुपरस्टार आहेत.

8/13
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या फिल्मप्रमाणेच त्याच्या फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी विशेष लोकप्रिय आहे. मात्र, एक काळ असा होता, जेव्हा त्याच्या डोक्यावर छप्पर नव्हतं. मार्शल आर्ट्स शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला खरा, पण तिथे राहण्यासाठी त्याच्याकडे जागाच नव्हती.

9/13
अशा परिस्थितीत त्याने एका ढाब्यावर आचारी आणि वेटर म्हणून काम केलं. अनेक वर्ष त्याने हॉटेलच्या जमिनीवर झोपून काढली. पण त्याची उंची आणि पर्सनॅलिटीने त्याला आधी मॉडेलिंग आणि नंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख मिळवून दिली.

10/13
उत्तर प्रदेशच्या एका छोट्या गावातून आलेल्या नवाजुद्दीनकडे ना फिल्मी बॅकग्राउंड होतं, ना हिरोचे लुक्स. त्याने काही काळ वडोदरा येथे केमिस्ट म्हणून काम केलं. पण, अभिनयाची ओढ त्याला दिल्लीला घेऊन आली.

11/13
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) प्रवेश घेण्यासाठी आणि दिल्लीत तग धरण्यासाठी त्याने तब्बल दीड वर्ष एका ऑफिसमध्ये वॉचमनची नोकरी केली. दिवसभर ड्युटी आणि रात्री नाटकाची तालीम, अशा संघर्षातून आज नवाजने स्वतःचं स्थान निर्माण केलंय.

12/13
दिग्गज सुपरस्टार दिलीप कुमार यांचे वडील फळांचे व्यापारी होते, पण वडिलांशी पटलं नाही म्हणून त्यांनी घर सोडलं आणि पुणे गाठलं. पुण्यातील एका कँटीनमध्ये सँडविच बनवण्याचं आणि फळं विकण्याचं काम त्यांनी केलं. दिलीप यांचं इंग्रजी चांगलं असल्याने त्यांना ब्रिटिश आर्मी कँटीनचे मॅनेजर बनवण्यात आले. पुढे मुंबईत आल्यावर देविका राणी यांनी त्यांना 'ज्वार भाटा'मध्ये संधी दिली आणि युसूफ खानचे 'दिलीप कुमार' झाले.

13/13
एव्हरग्रीन देव आनंद जेव्हा मुंबईत आले, तेव्हा त्यांच्या खिशात फक्त ३० रुपये होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी मिलिटरी सेन्सर ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम केलं. सैनिकांची पत्रं वाचणं आणि ती सेन्सर करणं हे त्यांचं काम होतं, ज्यासाठी त्यांना १६५ रुपये पगार मिळायचा. पण, डोळ्यात सुपरस्टार बनण्याचं स्वप्न होतं आणि प्रभात फिल्म्ससोबत झालेल्या एका कराराने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement