advertisement

डोक्याला बॉल लागून खेळाडू मैदानात कोसळला, बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलला नेलं, पाकिस्तान सुपर लीगमध्ये मोठा अपघात!

Last Updated:

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये मोठा अपघात झाला आहे. डोक्याला बॉल लागल्यामुळे इस्लामाबाद युनायटेडचा खेळाडू मैदानातच बेशुद्ध झाला आहे, यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

डोक्याला बॉल लागून खेळाडू मैदानात कोसळला, बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलला नेलं, पाकिस्तान सुपर लीगमध्ये मोठा अपघात!
डोक्याला बॉल लागून खेळाडू मैदानात कोसळला, बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलला नेलं, पाकिस्तान सुपर लीगमध्ये मोठा अपघात!
मुंबई : पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये मोठा अपघात झाला आहे. डोक्याला बॉल लागल्यामुळे इस्लामाबाद युनायटेडचा खेळाडू मैदानातच बेशुद्ध झाला आहे, यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इस्लामाबाद युनायटेडचं नेट सेशन सुरू असताना मीर हमजा सज्जाद याच्या डोक्याला बॉल लागला आणि तो बेशुद्ध पडला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचार करण्यात आले. सध्या सज्जाद शुद्धीत आला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
मंगळवारी हनीफ मोहम्मद हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये नेट प्रॅक्टिस सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. टीमचा बॅटर मार्क चॅपमनने मारलेला शॉट थेट सज्जादच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागला आणि सज्जाद मैदानातच बेशुद्ध पडला.
सज्जाद बेशुद्ध पडल्यानंतर ताबडतोब त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार सज्जाद आता शुद्धीमध्ये आला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. कोणताही धोका टाळण्यासाठी डॉक्टर सज्जादचा सीटी स्कॅनही करणार आहेत, ज्यातून त्याला गंभीर दुखापत झाली आहे का? हे स्पष्ट होईल.
advertisement

कोण आहे मीर हमजा सज्जाद?

मीर हमजा सज्जादने आतापर्यंत 6 टी-20 मॅच खेळल्या आहेत, ज्यात त्याने 8 विकेट घेतल्या आहेत. तर 8 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 25 विकेट आहेत. फास्ट बॉलर असलेल्या मीर हमजा सज्जादला पीएसएल 2026 च्या लिलावात इस्लामाबाद युनायटेडने टीममध्ये घेतलं. इस्लामाबाद युनायटेडने सज्जादवर 70 लाख पाकिस्तानी रुपयांची बोली लावली, पण अजूनही त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
advertisement
इस्लामाबाद युनायटेड शादाब खानच्या नेतृत्वात पीएसएलमध्ये खेळत आहे. 4 सामन्यांमध्ये इस्लामाबादने 2 सामने जिंकले आहेत तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला असून एक सामना रद्द झाला आहे. 5 पॉईंट्ससह इस्लामाबाद पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. इस्लामाबादचा नेट रनरेट 1.055 आहे. त्यांचा पुढचा सामना लाहोर कलंदर्सविरुद्ध गुरूवारी नॅशनल बँक स्टेडियममध्ये होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
डोक्याला बॉल लागून खेळाडू मैदानात कोसळला, बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलला नेलं, पाकिस्तान सुपर लीगमध्ये मोठा अपघात!
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement