Currency : खिशात फक्त 10 हजार आणि तरीही तुम्ही बनता 'करोडपती'; जगातील असं देश जिथे भारतीय असतात मालामाल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भारतापासून हवाई मार्गे अवघ्या 2,500 किलोमीटर अंतरावर एक असा देश आहे, जिथे तुम्ही पोहोचताच क्षणार्धात 'करोडपती' बनता.
मुंबई : कल्पना करा, तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला गेलात आणि बिल आलं चक्क 1 लाख रुपये. हे ऐकून कोणाचेही पाय डगमगतील. एखाद्या कप चहासाठी 20 हजार रुपये मोजायचे असतील, तर सामान्य माणूस तिथे पाऊल ठेवण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल. तुम्हाला वाटेल हे एखाद्या काल्पनिक सिनेमातलं दृश्य आहे, पण हे पूर्णपणे सत्य आहे. भारतापासून हवाई मार्गे अवघ्या 2,500 किलोमीटर अंतरावर एक असा देश आहे, जिथे तुम्ही पोहोचताच क्षणार्धात 'करोडपती' बनता.
दक्षिण-पूर्व आशियातील 'लाओस' (Laos) हा तो देश. सध्या भारतीय पर्यटकांमध्ये या देशाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. पण मग साधा 10 रुपयांचा चहा इथे 20 हजार रुपयांना का मिळतोय?
जेव्हा आपण परदेशात जातो, तेव्हा तिथली वस्तू महाग आहे की स्वस्त, हे तिथल्या चलनावरून ठरतं. लाओसचं चलन आहे 'कीप' (Kip). तिथे एक कप चहाची किंमत 20,000 कीप असते. ऐकायला हे खूप मोठं वाटत असलं, तरी भारतीय चलनात त्याची किंमत फक्त 50 रुपयांच्या आसपास असते. म्हणजेच, लाओसमध्ये लाखात बिल भरणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. पर्यटक तिथे नोटांच्या गड्ड्या घेऊन फिरताना दिसतात, कारण तिथल्या चलनाचं मूल्य भारतीय रुपयाच्या तुलनेत खूपच कमी आहे.
advertisement
करन्सीचं गणित: 1 रुपया म्हणजे किती?
मार्च 2026 च्या विनिमय दरानुसार, 1 भारतीय रुपया म्हणजे सुमारे 232 लाओशियन कीप (LAK). याचाच अर्थ, जर तुमच्या खिशात फक्त 45,000 रुपये असतील, तर लाओसमध्ये तुम्ही अधिकृतपणे करोडपती असता. याच कारणामुळे दरवर्षी सुमारे 55 लाख परदेशी पर्यटक या देशाला भेट देतात आणि तिथल्या अर्थव्यवस्थेत 1 अब्ज डॉलर्सचं योगदान देतात.
advertisement
लाओसमध्ये काय स्वस्त आणि काय महाग?
पाण्याची बाटली: 8,000 ते 12,000 कीप (भारतीय रुपये: 35 ते 50)
नाश्ता: 25,000 ते 50,000 कीप (भारतीय रुपये: 170 ते 400)
हॉटेल भाडे (१ रात्र): 1,25,000 ते 3,50,000 कीप (भारतीय रुपये: 500 ते 2,000)
भारतीय पर्यटकांना लाओसमध्ये 'व्हिसा ऑन अरायव्हल'ची (Visa on Arrival) सुविधा मिळत असल्याने तिथे जाणं अधिक सोपं झालं आहे.
advertisement
लाओसमध्ये नक्की पाहायचं काय?
1. लुआंग प्रबांग (Luang Prabang): युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले हे शहर बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध आहे. येथील 'आल्म्स गिव्हिंग' ही पहाटेची भिक्षा सोहळा पाहण्यासारखा असतो.
2. कुआंग सी धबधबा (Kuang Si Falls): दुधाल निळ्या पाण्याचा हा धबधबा निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे. इथे तुम्ही नैसर्गिक कुंडात पोहण्याचा आनंद घेऊ शकता.
advertisement
3. वेंग विएंग (Vang Vieng): ज्यांना साहसी खेळांची आवड आहे, त्यांच्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. हॉट एअर बलून राईड आणि गुंफांचे दर्शन हे इथलं मुख्य आकर्षण आहे.
4. प्लेन ऑफ जार्स (Plain of Jars): हे इतिहासातील एक मोठं रहस्य आहे. येथे दगडाचे हजारो विशाल रांजण विखुरलेले आहेत, जे सुमारे 2,000 वर्ष जुने आहेत. हे नक्की कशासाठी वापरले जात होते, हे आजही गुपित आहे.
advertisement
थोडक्यात काय: जर तुम्हाला कमी खर्चात परदेशवारी करायची असेल आणि करोडपती असल्याचा फील घ्यायचा असेल, तर लाओस हा तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय आहे. शांतता, निसर्ग आणि बौद्ध संस्कृतीचा हा संगम तुम्हाला नक्कीच भुरळ घालेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 9:50 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Currency : खिशात फक्त 10 हजार आणि तरीही तुम्ही बनता 'करोडपती'; जगातील असं देश जिथे भारतीय असतात मालामाल










