बारामतीत ठिणगी! पार्थ पवारांचे वक्तव्य काँग्रेसच्या जिव्हारी? पोटनिवडणूक बिनविरोधची शक्यता मावळली
- Published by:Prachi Amale
- Reported by:PRANALI KAPASE
Last Updated:
काँग्रेसनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
मुंबई : काँग्रेस बारामती निवडणुकीत माघार घेण्याची शक्यता धुसर झाली आहे. पार्थ पवारांच्या डाऊनफॉलच्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज असल्याची माहिती. समोर आली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून सुनेत्रा पवारांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
बारामती विधानसभा मतदासंघात पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्याचा अखेरचा दिवस आहे. पण ही बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी दादांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांकडून पुढाकार घेणं अपेक्षित होतं. त्यासाठी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींशी संवाद साधणं महत्त्वाचं होतं. मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमी पडल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवार गेल्या आठवड्यातच दिल्लीला जाऊन आल्या पण त्यांनी काँग्रेसच्या कुठल्याच नेत्यांची भेट घेतली नाही. तर महाराष्ट्रातीलही कुठल्याच नेत्याशी संपर्क साधला नसल्याचं बोललं जातंय. दरम्यान काँग्रेसनं बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तर दुसरीकडे पार्थ पवारांनी न्यूज एटीन मराठीशी बोलताना थेट काँग्रेसच्या पतनाचं केलेलं भाकीत काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे काँग्रेसनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
advertisement
पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचा प्रयत्न
बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी महायुती प्रयत्न करत आहेस तसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही केला पण असे करताना काँग्रेस पक्षाला त्यांनी विचारात घेतले नाही. माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच काँग्रेस उमेदवार देऊ शकतं असे संकेत दिले होते. पण राष्ट्रवादीने मात्र त्याकडे लक्ष दिले नाही. अजूनही एक दिवस शिल्लक आहे त्यामुळे काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते हे बघावेत लागेल. त्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र काँग्रेसचे कौतुक करत अजित पवार यांना खरा न्याय कोणी दिला असेल तर तो काँग्रेसने असे म्हटले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या भावाच्या म्हणजे पार्थ पवार यांच्या वक्त्व्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पार्थ यांचे वक्तव्य चुकीचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
आत्या आणि भाच्याने य निर्माण झालेली परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न केलाय खरा पण तो कितपत यश्स्वी होईल हे बघावे लागले. तिकडे सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीत संवाद असायला हवा होता. त्यांच्याकडून काँग्रेसशी कुणी संपर्क साधला हे मला माहिती नाही मला कुणी संपर्क करायला सांगितले नाही असं म्हणत संवाद ठेवायला हवा होता असा सल्ला दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 9:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बारामतीत ठिणगी! पार्थ पवारांचे वक्तव्य काँग्रेसच्या जिव्हारी? पोटनिवडणूक बिनविरोधची शक्यता मावळली










