Bhiwandi Water Supply: भिवंडीत 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद; कधी, कोणत्या भागात असेल पाणीबाणी?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
भिवंडी- निझामपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भिवंडी शहरामध्ये येत्या 24 तासांसाठी पाणीपुरवठा खंडीत राहणार आहे.
ठाणे: भिवंडी- निझामपूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भिवंडी- निझामपूरमध्ये येत्या 11 एप्रिल आणि 12 एप्रिल रोजी पाणी मिळणार नाही. त्यामुळे आत्ताच पूर्व तयारी करून ठेवा. भिवंडी- निझामपूर महानगर पालिकेच्या स्टेम वॉटर सप्लाय अथॉरिटीकडून दैनंदिन आणि मान्सूनपूर्व आवश्यक देखभाल- दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आले आहे. भिवंडी शहरातील अनेक भागांमध्ये, बुधवारी (8 एप्रिल) सकाळी 9 वाजेपासून ते गुरुवारी (9 एप्रिल) सकाळी 9 वाजेपर्यंत अशा 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
स्टेम वॉटर सप्लाय अथॉरिटीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने पूर्वी, 8 एप्रिल आणि 9 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण तो नियोजित असलेला शटडाउन पुढे ढकलण्यात आला. भिवंडी- निझामपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये, दैनंदिन आणि मान्सूनपूर्व आवश्यक देखभाल- दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याचा निर्णय हा महानगरपालिकेचा आहे. या कालावधीत, संपूर्ण भिवंडी शहरामध्ये स्टेम नेटवर्क मार्फत होणार्या क्षेत्रामध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. याव्यतिरिक्त, महापालिकेने असा इशारा दिला आहे की, 12 एप्रिल रोजी पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरही, रहिवाशांना पुढील २४ तासांसाठी कमी दाबाने आणि कमी पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
कोणकोणत्या परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार?
भिवंडी शहरातील ममता टाकी, चार्विद्रा गाव, पटेलनगर, बाला कंपाऊन्ड, फरीदबाग, बारक्या कंपाऊन्ड, संगमपाडा, कचेरीपाडा, ब्राम्हणआळी, कसारआळी, भावेनगर, कोंबडपाडा, आदर्शपार्क, अजयनगर, नझराना कंपाऊन्ड, गोकुळनगर, इंदिरानगर, कल्याणरोड, ठाणगेआळी, तीनबत्ती, शिवाजीनगर स्टाफ क्वॉटर्स, खडकरोड, गुरुचरणपाडा, अजमेरनगर, पटेल कंपा., शमानगर, साईनाथ सोसायटी, अंजूरफाटा, देवजीनगर, नारपोली, विठ्ठलनगर, सोनीबाई, कंपाऊन्ड, खलीक कंपाउन्ड, फैजान कंपाऊन्ड, मेहता कंपाऊन्ड, रोशनबाग, देऊनगर टावरे कंपाउन्ड, भंडारी कंपाऊन्ड, नारपोली गाव, देवजीनगर, आय.जी.एम. पाण्याची टाकी, निजामपूरा, इस्लामपुरा, आमपाडा, अवचितपाडा, म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर, नेहरूनगर, मिल्लतनगर १,२,३, नविवस्ती, कोंडाजीवाडी, चव्हाण कॉलनी, वेताळपाडा, बाळा कंपाऊन्ड, खंडूपाडा, अंसार मोहल्ला, डोलारे पेट्रोलपंप, खोका कंपाऊन्ड, कामतघर, अंजूरफाटा, जूनी ताडाली, नवी ताडाली, भाग्यनगर, हनूमान नगर, जयअंबे सोसायटी, कमला हॉटेल परीसर, श्रीरंग सोसायटी, गणेश सिनेमा, नवजीवन कॉलनी, समदनगर, कणेरी, न्यु कणेरी, गौरीपाडा, पद्यानगर, अशोकनगर, घुंघटनगर, कोटरगेट, बरफ गल्ली, कापआळी, इस्लामपूरा, उर्दरोड, कुरेशनगर, लाहोटी कंपाऊन्ड, भादवड, टेमघर या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे अशी माहिती भिवंडी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.
advertisement
भिवंडी- निझामपूर महानगर पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटनवर यांनी रहिवाशांना आवाहन केले आहे की, देखभाल दुरुस्तीचे काम सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी त्यांनी आधीच दोन ते तीन दिवस पुरेल इतका जास्तीचे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, पाणी बंद असण्याच्या काळात महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
Location :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 10:39 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Bhiwandi Water Supply: भिवंडीत 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद; कधी, कोणत्या भागात असेल पाणीबाणी?









