advertisement

40 मिनिटांचा प्रवास, अखेरच्या क्षणी अनर्थ, पायलटही हतबल, अजित पवारांच्या विमानासोबत नक्की काय घडलं?

Last Updated:

Ajit Pawar Passes Away Latest News: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

News18
News18
Ajit Pawar Passes Away Latest News: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या अपघाताची बातमी समोर येताच महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून अनेक नेते बारामतीच्या दिशेनं रवाना झाले आहेत. अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त त्यांच्या सभा आयोजित केल्या होत्या. पण मुंबई ते बारामती हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या विमानाने सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून टेक ऑफ केलं होतं. हे विमान ४० मिनिटांत बारामती विमानतळाजवळ पोहोचलं. यावेळी लँडिंग करत असताना अखेरच्या क्षणी अनर्थ घडला. पायलटने सुरक्षित लँडींग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं. यानंतर हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं.
advertisement

नेमकं काय घडलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगच्या स्थितीत असताना वैमानिकाने सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, त्याच निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड उद्भवला. लँडिंगदरम्यान विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तांत्रिक त्रुटीमुळे विमानाने दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
अपघात नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
तपास यंत्रणांच्या मते, 'ब्लॅक बॉक्स' (Black Box) हाती आल्यानंतरच या दुर्घटनेचे नेमके आणि अचूक कारण स्पष्ट होईल. विमानाच्या उड्डाणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचा सर्व डेटा आणि वैमानिकांचे संभाषण यात रेकॉर्ड केलेले असते, त्यामुळे हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement

विमान अपघातात कुणा-कुणाचा मृत्यू झाला?

खासगी VSR कंपनीचे विमान
एकूण प्रवासी 05
1. माननीय अजित दादा पवार साहेब
2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
4. कॅप्टन संभवी पाठक
5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
40 मिनिटांचा प्रवास, अखेरच्या क्षणी अनर्थ, पायलटही हतबल, अजित पवारांच्या विमानासोबत नक्की काय घडलं?
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement