advertisement

नोकरीच्या शोधात आला, हमाल म्हणून राहिला, तिसऱ्याच दिवशी केलं कांड, आता मुंबई पोलीस मागावर

Last Updated:

Mumbai News: कामगारांनी रोहितशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल फोन बंद होता.

नोकरीच्या शोधात आला, हमाल म्हणून राहिला, तिसऱ्याच दिवशी केलं कांड, आता मुंबई पोलील मागावर
नोकरीच्या शोधात आला, हमाल म्हणून राहिला, तिसऱ्याच दिवशी केलं कांड, आता मुंबई पोलील मागावर
मुंबई: तुर्भे येथील जनता मार्केटमध्ये एका धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. नोकरीच्या शोधात आलेल्या तरुणाने हमाल म्हणून काम सुरू केल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी दुकानातून मौल्यवान साहित्य चोरून पळ काढल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
व्यापारी जयेश वोरा यांच्या सिरॅमिक्स दुकानात 31 मार्च रोजी रोहित चौधरी (वय 22) हा तरुण कामाच्या शोधात आला होता. त्याची गरज ओळखून, दुकानात आधीच सहा कामगार असतानाही वोरा यांनी त्याला हमाल म्हणून कामावर घेतले. सुरुवातीचे दोन दिवस त्याने व्यवस्थित काम केले आणि कोणतीही शंका निर्माण केली नाही.
advertisement
घटनेच्या दिवशी गुरुवारी दुकानात नव्या मालाचा मोठा साठा टेम्पोद्वारे आणण्यात आला होता. हा माल उतरवण्याचे काम रोहितकडे सोपवण्यात आले होते. त्याने हे काम पार पाडल्यानंतर तो जेवणाच्या निमित्ताने बाहेर गेला. दरम्यान इतर कामगारांनी मालाची तपासणी केली असता एक बॉक्स कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
कामगारांनी रोहितशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल फोन बंद होता. त्यामुळे संशय वाढल्याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात रोहित माल उतरवत असताना एक बॉक्स जवळच उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला देताना स्पष्ट दिसून आला. या बॉक्समध्ये गिझर आणि त्याचे फिटिंग किट होते, ज्याची एकूण किंमत सुमारे 1 लाख 18 हजार रुपये होती.
advertisement
या घटनेनंतर व्यापारी जयेश वोरा यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रोहित चौधरीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
नोकरीच्या शोधात आला, हमाल म्हणून राहिला, तिसऱ्याच दिवशी केलं कांड, आता मुंबई पोलीस मागावर
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement