Kalyan Accident : सगळ्यांना वाचवलं, पण स्वतःला नाही वाचवू शकले; कल्याणमधील डॉक्टरचा दुर्दैवी अंत
Last Updated:
Kalyan Accident : कल्याणमधील शहाड उड्डाण पुलावर डॉक्टर सोमनाथ पाटील यांचा मृत्यू झाला. नेमकी ही घटना कशी घडली आणि पुढील तपासात काय समोर आले ते जाणून घ्या.
कल्याण : कल्याण शहरात राहणाऱ्या एका डॉक्टर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जिथं कुटुंबीयांनी ज्या गोष्टीचा कधीच विचार नाही केला, दुर्दैवी घटना एका रात्रीत त्यांच्या आयुष्यात घडली. नेमकं काय घडलं?
शहाड पुलावर काळाचा घाला
कल्याणमधील शहाड उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघातात एका डॉक्टरांचा जागीच मृत्यू झालेला आहे. भरधाव वेगात येणार्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली त्यामुळे हा अपघात घडलेला आहे. घडलेल्या या अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव डॉ.सोमनाथ पाटील असून ते कल्याणधील खडकपाडा परिसरात राहतात.
पण डॉक्टर घरी परतलेच नाहीत
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा डॉक्टर पाटील हे दुचाकीवरुन शहाड उड्डाणपुलावरुन प्रवास करत होते. दरम्यान टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतका भीषण होती की पाटील हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले आणि दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झालेला आहे.
advertisement
अपघातानंतर चालकाचा पळण्याचा प्रयत्न
घटनास्थळी असलेल्या अन्य वाहन चालकांनी आणि पादचाऱ्यांनी तात्काळ मदत करत पाटील यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गंभीर गोष्ट म्हणजे अपघातानंतर टेम्पो चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण काही नागरिकांनी त्याला पकडून ठेवले आणि पोलिसांनी घडलेल्या अपघाताची बातमी कळवण्यात आली.
advertisement
पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि वाहतूक सुरळीत केली.दरम्यान या अपघातामुळे काही मिनिटं वाहतूककोंडी झाली होती. दरम्यान पोलिसांनी टेम्पो चालक बॉबी चंदन जुनी याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 8:28 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Kalyan Accident : सगळ्यांना वाचवलं, पण स्वतःला नाही वाचवू शकले; कल्याणमधील डॉक्टरचा दुर्दैवी अंत









