advertisement

अशोक खरातला कुणीतरी आवरा! लैंगिक शोषणानंतर आता नवा कांड; 12 वा गुन्हा दाखल, नेमकं काय केलं?

Last Updated:

Ashok Kharat News: भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांना आपल्या लैंगिक वासनेचा शिकार करणारा नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.

ashok kharat
ashok kharat
Ashok Kharat News : भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांना आपल्या लैंगिक वासनेचा शिकार करणारा नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याच्याविरोधात बारावा गुन्हा दाखल झाला आहे. एका व्यापाऱ्याने त्याच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. यावेळी त्याने एका कांदा व्यापाऱ्याला गंडा घातल्याचं उघडकीस आले असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू खरातने कांदा व्यापाऱ्याला प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचं आमिष दाखवलं होतं. त्याने व्यापाऱ्याकडून ६० लाख रुपये किंमत असलेली जागा वृद्धाश्रमाच्या नावावर केवळ २२ लाख २५ हजार रुपयांत खरेदी केली. इतकेच नाही, तर वृद्धाश्रमाच्या जागेच्या बदल्यात चांगल्या लोकेशनवर जागा मिळवून देण्याचं आश्वासन आरोपीनं दिलं होतं. यातून त्याने व्यापाऱ्याकडून तब्बल ८५ लाख रुपये उकळले, परंतु कोणतीही जागा दिली नाही.
advertisement

... अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल

आरोपी खरातने कांदा व्यापाऱ्याची केवळ आर्थिक फसवणूकच केली नाही , तर त्याने व्यापाऱ्याला मानसिकरित्या त्रासही दिला. जेव्हा व्यापाऱ्याने आपल्या पैशांचा किंवा जागेचा तगादा लावला, तेव्हा "जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल आणि तुझे वाईट होईल," अशा शब्दांत शाप देत खरातने व्यापाऱ्याला घाबरवलं. मागील अनेक दिवसांपासून आरोपी अशाप्रकारे छळ करत होता.
advertisement
अशोक खरातचं महिला लैंगिक छळाचं प्रकरण उघडकीस आल्यापासून त्याचा गुन्हेगारी कृत्यांचा आलेख वाढतच चालला आहे. भोंदू खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ८ गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे लैंगिक शोषणाचे आहेत, तर ४ गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. आता या नव्या प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करत पोलीस करत असून खरातच्या संपर्कात असलेले आणखी कोणी फसवणुकीचे बळी पडले आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
अशोक खरातला कुणीतरी आवरा! लैंगिक शोषणानंतर आता नवा कांड; 12 वा गुन्हा दाखल, नेमकं काय केलं?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement