Pune Weather: पुन्हा सरी बरसणार! पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा? पुढील दोन दिवस 'असं' असेल हवामान
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पावसाच्या विश्रांतीमुळे पुण्याच्या कमाल तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, पुढील दोन दिवसात पुण्यातील वातावरणात पुन्हा काहीसा बदल पाहायला मिळेल.
पुणे : गेल्या चार दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, शुक्रवारी (३ एप्रिल) पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात बदल झाला आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे पुण्याच्या कमाल तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, पुढील दोन दिवसात पुण्यातील वातावरणात पुन्हा काहीसा बदल पाहायला मिळेल. पुण्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे.
तापमानातील चढ-उतार
पावसाने विश्रांती घेताच पाऱ्यात २ अंशांनी वाढ होऊन तो ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. रात्रीच्या गारव्यातही किंचित बदल झाला असून किमान तापमान १७.७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.
पुढील ४८ तासांचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (४ एप्रिल) आणि रविवारी पुण्याचे हवामान स्थिर राहील. सकाळी आकाश मुख्यतः निरभ्र राहील. दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात, ज्यामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळू शकतो.
advertisement
पुढील दोन दिवस कमाल आणि किमान तापमान स्थिर राहणार असल्याने पुणेकरांना संमिश्र हवामानाचा अनुभव येईल.
या भागात यलो अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्राला अवकाळी संकटाने हैराण केल्याचं चित्र आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या ताज्या अंदाजानुसार, 4 एप्रिलला महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30-50 किमी वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे. काही भागांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 9:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Weather: पुन्हा सरी बरसणार! पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा? पुढील दोन दिवस 'असं' असेल हवामान








