advertisement

Navi Mumbai : प्रतीक्षा संपली! वाशीतून पनवेल सुसाट,15 मिनिटे वाचणार; कधी पासून करता येणार प्रवास?

Last Updated:

Vashi Flyover : वाशीतील पामबीच मार्ग आणि शीव–पनवेल महामार्गाला जोडणारा नवा उड्डाणपुलाचे काम झाले असून आता तो नागरिकांच्या खुला झाला आहे का नाही त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

पामबीच ते शीव–पनवेल थेट कनेक्टिव्हिटी
पामबीच ते शीव–पनवेल थेट कनेक्टिव्हिटी
मुंबई : वाशी शहरातील पामबीच मार्गावरुन आता थेट शीव-पनवेल महामार्गावर जाण्यासाठी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गुरुवाती या दोन नव्या आणि महत्त्वाच्या मार्गांना जोडणाऱ्या नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या पुलासाठी साधारण 18 कोटी 32 लाख रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे.
प्रवासात किती वेळ वाचणार?
नव्या उड्डाणपुलामुळे आता प्रवाशांची दररोज आता 10 ते 15 मिनिटांची बचत होणार आहे.याआधी पामबीच मार्गावरुन प्रवाशांना शीव-पनवेल महामार्गावर जाण्यासाठी सानपाडा मार्गे खुप जास्त वेळेचा वळसा घ्यावा लागत होता. त्यामुळे जास्त वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात होते.
उड्डाणपुलाची सविस्तर माहिती
हा उड्डाणपूल सुमारे 290 मीटर लांबीचा आणि साडेसहा मीटर रुंदीचा असा असून वाशीतील पामबीच सीटी बँकजवळ असलेल्या चौकातून थेट महामार्गाला जोडतो. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते आणि वाहनांना वेगवान मार्ग मिळतो.
advertisement
वाहनचालकाना या प्रकल्पासाठी अने वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती.पहिल्यांदा तर निविदेला पाहिजे तसा प्रतिसाद नव्हता मिळाल्याने काम प्रलंबित होते. पण दोन वर्षांपूर्वी कामाला सुरुवात होऊन आता या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : प्रतीक्षा संपली! वाशीतून पनवेल सुसाट,15 मिनिटे वाचणार; कधी पासून करता येणार प्रवास?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement