advertisement

IPL इतिहासातील सर्वात मोठी कारवाई! श्रेयस अय्यरला 24 लाखांचा दंड, तर PBKS च्या सर्व 12 खेळाडूंना BCCI ने सुनावली शिक्षा

Last Updated:

IPL 2026 Shreyas Iyer fined 24 Lack : आयपीएलच्या आचारसंहितेनुसार (Code of Conduct) पंजाबचा या सीजनमधील हा दुसरा गुन्हा ठरला आहे. श्रेयस अय्यरला तब्बल 24 लाख रुपयांचा दंड भरवावा लागणार आहे.

IPL 2026 Shreyas Iyer fined 24 Lack
IPL 2026 Shreyas Iyer fined 24 Lack
IPL 2026 PBKS Team Fined : आयपीएल 2026 मध्ये सलग दुसरा विजय मिळवूनही पंजाब किंग्सने पाईंट्स टेबलमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. परंतू बीसीसीआयने संपूर्ण पंजाब किंग्ज टीमला शिक्षा सुनावली आहे. कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबने स्लो ओव्हर-रेट राखल्यामुळे श्रेयसला आयपीएल प्रशासनाकडून मोठा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आयपीएलकडून देण्यात आली आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या मॅच नंबर 7 मध्ये पंजाबची टीम ठरलेल्या वेळेत बॉलिंग पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पंजाब किंग्जचा दुसरा गुन्हा अन् कारवाई

आयपीएलच्या आचारसंहितेनुसार (Code of Conduct) पंजाबचा या सीजनमधील हा दुसरा गुन्हा ठरला आहे. आर्टिकल 2.22 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून श्रेयस अय्यरला तब्बल 24 लाख रुपयांचा दंड भरवावा लागणार आहे. मॅच जिंकूनही ओव्हर-रेटच्या नियमाचे उल्लंघन करणं पंजाबच्या टीमला भारी पडल्याचं पहायला मिळतंय. मॅचमध्ये 18 व्या ओव्हरमध्ये बॉलिंगचा अवधी समाप्त झाला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
advertisement

संपूर्ण टीमसह इम्पॅक्ट प्लेयरवरही कारवाई

या दंडाचा फटका केवळ कॅप्टनलाच बसला नसून संपूर्ण प्लेइंग इलेव्हनलाही त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. यामध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा देखील समावेश करण्यात आला आहे. टीममधील प्रत्येक सदस्याला 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के, यापैकी जी रक्कम कमी असेल तितका दंड भरावा लागणार आहे. यापूर्वीच्या गुजरातविरुद्धच्या मॅचमध्येही पंजाबकडून अशाच प्रकारची चूक झाली होती.
advertisement

श्रेयस अय्यरवर सस्पेंशनची टांगती तलवार

दरम्यान, वारंवार होणाऱ्या या चुकांमुळे आगामी मॅचमध्ये श्रेयस अय्यरवर सस्पेंशनची टांगती तलवार असू शकते. सलग तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कॅप्टनवर एका मॅचची बंदी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पंजाब किंग्स आगामी सामन्यांमध्ये वेळेचे नियोजन कसं करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. श्रेयस अय्यरला अर्शदीपला वॉर्निंग द्यावी लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL इतिहासातील सर्वात मोठी कारवाई! श्रेयस अय्यरला 24 लाखांचा दंड, तर PBKS च्या सर्व 12 खेळाडूंना BCCI ने सुनावली शिक्षा
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement