advertisement

PBKS vs CSK : फक्त 22 मिनिटं मैदानात खेळला अन् 355 स्ट्राईक रेटने मॅच जिंकवून गेला! चेन्नईने इथंच गमावली होती मॅच

Last Updated:

Priyansh Arya impactful knock : प्रियांशने पहिल्याच बॉलपासून चेन्नईला टप्प्यात घेतलं अन् कार्यक्रम सुरू केला. प्रियांशने एकही बॉलला सुट्टी दिली नाही अन् सगळे बॉल बॉन्ड्रीच्या दर्शनाला पाठवले.

Priyansh Arya impactful knock
Priyansh Arya impactful knock
PBKS vs CSK Priyansh Arya impactful knock : एक काळ असा होता जेव्हा चेपॉक म्हटलं की चेन्नईची विजय पक्का, असं समीकरण मांडलं जायचं. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इतकी मजबूत होती, ती बाकी टीम्स 14 वजा 1 असं गणित मांडून प्लेऑफचं कॅल्कुलेशन करायच्या. मात्र, आता सीएसके ट्रॅन्झिशन फेजमधून जात असताना चेपॉर्कचे रंग बदलताना दिसतायेत. पंजाब किंग्ज याचा सर्वात मोठा फायदा करून घेत चेपॉकवर आपलं वर्चस्व निर्माण केलंय. अशातच कालच्या मॅचमध्ये आणखी एक विजय मिळवत पंजाबने चेपॉकवरची आपली दादागिरी दाखवून दिलीये. पण तुम्हाला माहिती नसेल तर फक्त 22 मिनिटात चेन्नई 4 तासांची मॅच हरली. कसं? पाहा

इथंच आला ट्विस्ट अन् सीएसकेचं मनोबलच खचलं

बॅटिंग पीचवर चेन्नईने धुंवाधार सुरूवात करत तब्बल 209 धावा उभ्या केल्या. 17 वर्षाच्या मुंबईकर आयुष म्हात्रेने आपल्याच अंदाजात बॅटिंग करत श्रेयस अय्यरला टेन्शन दिलं होतं. पण अखेरीस पंजाबने मुसक्या आवळ्या. शेवटच्या काही ओव्हरमध्ये शिवम दुबेने आपली ताकद दाखवली अन् सीएसकेला 209 धावांपर्यंत पोहोचवलं. त्यावेळी पंजाबवर मोठं दडपण होतं. पण इथंच आला ट्विस्ट अन् सीएसकेचं मनोबलच खचलं.
advertisement

पहिल्या 50 धावांची पार्टनरशीप

युवराज सिंगच्या तालमीचे दोन्ही पैलवान म्हणजेच प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग दोन्ही सलामीला आहे. त्यात प्रियांश आर्या थोडासा डावा... प्रियांशने पहिल्याच बॉलपासून चेन्नईला टप्प्यात घेतलं अन् कार्यक्रम सुरू केला. प्रियांशने एकही बॉलला सुट्टी दिली नाही अन् सगळे बॉल बॉन्ड्रीच्या दर्शनाला पाठवले. त्याचवेळी दोघांनी 50 धावांची पार्टनरशीप पूर्ण केली अन् पंजाबने सुटकेचा श्वास घेतला तर दुसरीकडे ऋतुराजला टेन्शन आलं.
advertisement
advertisement

चेन्नईच्या पारड्यातून मॅच काढली

पहिल्या 22 मिनिटातच प्रियांश आर्याने चेन्नईच्या पारड्यातून मॅच काढून घेतली. प्रियांशने 355 च्या स्ट्राईक रेटने 39 धावा केल्या. त्याने फक्त 11 बॉलमध्ये अशी कामगिरी करून दाखवली, ज्यामध्ये 3 फोर अन् 4 सिक्सचा समावेश होता. पहिल्या 4.1 ओव्हरमध्ये पंजाबचा स्कोर 61 रन्स होता. त्यामुळे चेन्नईने इथंच पराभव स्वीकारल्याचं चित्र समोर आलं होतं. याच अफलातून कामगिरीनंतर प्रियांश आर्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
advertisement
advertisement

11 बॉलमध्येच चेन्नईचा आत्मविश्वास तोडला

दरम्यान, तुम्हाला माहिती नसेल तर प्रियांश आर्या याचं नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हतं. चेस करताना त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवण्याचा निर्णय कॅप्टन श्रेयस अय्यर याने घेतला होता. युझवेंद्र चहलच्या जागी त्याला इम्पॅक्ट सब्ट्युट्यूट म्हणून खेळवलं अन् त्याने 11 बॉलमध्येच चेन्नईचा आत्मविश्वास तोडला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PBKS vs CSK : फक्त 22 मिनिटं मैदानात खेळला अन् 355 स्ट्राईक रेटने मॅच जिंकवून गेला! चेन्नईने इथंच गमावली होती मॅच
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement