2026 Volkswagen Taigun Facelift ची पहिली झलक आली समोर! पाहा कधी होतेय लॉन्च
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
2026 Volkswagen Taigun Facelift चा टीझर समोर आलाय. लवकरच ही कार लॉन्च होणार आहे. चला पाहूया या कारमध्ये कोणकोणते फीचर्स असतील.
नवी दिल्ली : भारतात एप्रिल महिन्यात नवनवीन कार लॉन्च होत आहेत. यामधील एक 2026 Volkswagen Taigun Facelift ही आहे. या कंपनीच्या कारची लॉन्चविषयी कंफर्म माहिती समोर आलीये. ही एक मिडसाइड एसयूव्हीचं पहिलं मोठं अपडेट आहे. जी 2021 मध्ये लॉन्च झालेल्या टायगुनचं अपडेटेड मॉडल असेल. टीझरमध्ये नवीन फ्रंट डिझाइन दिसतेय. ज्यावरुन Volkswagen Taigun ची ग्लोब स्टायलिंग स्पष्ट दिसतेय.
फेसलिफ्ट टायगुनच्या फ्रंटमध्ये सर्वात मोठा बदल दिसतोय. यात स्लिमर एलईडी हेडलँप्स, कनेक्टिंग एलईडी एलिमेंट, नवीन स्लीक ग्रिल आणि मध्ये इल्यूमिनेटेड VW लोगोही मिळेल. बंपर रीडिझाइन असतील. जे स्पोर्टी आणि एलिगेंट लूक देतील. मागेही नवीन एलईडी टेललाइट्स आणि रिफ्रेश्ड बंपर असण्याची शक्यता आहे. ओव्हरऑल रोड प्रेझेंस मजबूत आणि मॉडर्न असेल. चला नव्या अपडेटवरही नजर टाकूया.
advertisement
इंटीरियर आणि फीचर्स
कारच्या केबिनमध्ये प्रीमियम फील वाढेल. नवीन ट्रिम्स, चांगले मटेरियल्स आणि सॉफ्ट टच सरफेस मिळू शकतो. मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर (10.25 इंच), पॅनोरमिक सनरूफ आणि रियर सीट मसाज फंक्शनसारखे नवीन फीचर्स मिळू शकतात. एंबियंट लायटिंग, वायरलेस चार्जिंग आणि अपटेडेट डॅशबोर्ड लेआउट राहील.
advertisement
अपडेटेड मॉडलमध्ये AI असिस्टेंटचा 10.1 इंच इंफोटेनमेंट, वायरलेस अॅपल कारप्ले-अँड्रॉइड ऑटो, ऑटो क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड सीट्स, क्रूझ कंट्रोल आणि 360 डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स मिळतील. काही व्हेरिएंट्समध्ये मोठे डिजिटल क्लस्टर आणि चांगले कनेक्टेड कार टेक येतील.
advertisement
सेफ्टी डिटेल्स
टायगुन नेहमीपासून 5-स्टार सेफ्टीसाठी ओळखली जाते. याच्या फेसलिफ्ट अवतारातही 6 एयरबॅग्स, ESC, हिल होल्ड, रियर कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स आणि ADAS सारखे अडव्हान्स फीचर्स कायम राहतील किंवा वाढू शकतात. मजबूत MQB A0 IN प्लेटफॉर्मवर तयार SUV रोडवर दणकट राहील.
advertisement
इंजिन आणि मायलेज
इंजिनमध्ये मोठा बदल होणार नाही. 1.0 लिटर 3 सिलेंडर TSI (115 PS, 178 Nm) आणि 1.5-लिटर 4-सिलिंडर TSI (150 PS, 250 Nm) इंजिन जारी राहतील. 1.0 लिटर टर्बो इंजिनसह नवीन 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक (पहिले 6-स्पीड) मिळेल. ज्यामुळे स्मूद शिफ्ट्स आणि चांगले एफिशिएन्सी देईल. 1.5 लिटर टर्बो इंजिनमध्ये 7-स्पीड DSG राहील. मॅन्युअल गियरबॉक्समध्येही उपलब्ध असेल. मायलेजमध्ये किरकोळ सुधारणा शक्य आहे.
advertisement
एक्सपेक्टेड प्राइज
फेसलिफ्ट मॉडलची किंमत 12 लाख ते 21 लाख (एक्स-शोरुम) दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या मॉडलपेक्षा थोडी वाढ होऊ शकते. भारतीय मार्केटमध्ये स्कोडा कुशाक फेसलिफ्ट, हुंडई क्रेटा, किआ सेल्टोससारख्या गाड्या टक्कर देतील. एकूणच 2026 टायगुन फेसलिफ्ट स्टाइल, टेक आणि रिफाइनमेंटमध्ये मजबूत अपडेटसह येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 10:20 AM IST









