Success Story: एका एकरात केली 340 झाडांची लागवड, शेतकऱ्याला 6 लाख उत्पन्न, असं काय केलं?

Last Updated:

शेतकरी देविदास चव्हाण हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डाळिंबाची शेती करत आहेत. एका एकरात डाळिंबाची लागवड केली असून यामध्ये जवळपास 340 झाडांची लागवड केली आहे.

+
News18

News18

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाफळे गावातील शेतकरी देविदास मच्छिंद्र चव्हाण हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डाळिंबाची शेती करत आहेत. एका एकरात डाळिंबाची लागवड केली असून यामध्ये जवळपास 340 झाडांची लागवड केली आहे. डाळिंबाची लागवड करण्यासाठी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च आला असून, सर्व खर्च वजा करून सहा लाख रुपयांचे उत्पन्न शेतकरी देविदास चव्हाण यांना मिळणार आहे.
वाफळे गावात राहणारे शेतकरी देविदास मच्छिंद्र चव्हाण यांनी एका एकरात साधा भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. साधा भगवा डाळिंबाची लागवड करण्याआधी देविदास यांनी शेतामध्ये चारी मारून 14 बाय 8 वर डाळिंबाच्या रोपांची लागवड एका एकरात केली आहे. त्यानंतर बेड मारून शेणखत, भेसळ डोस भरून घेतले. पहिल्या वर्षी डाळिंबाची लागवड केल्यावर देविदास चव्हाण यांना सर्व खर्च वजा करून 50 ते 60 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले होते.
advertisement
दुसऱ्या वर्षी बागेचे व्यवस्थापन व्यवस्थित झाले असून एका झाडाला कमीत कमी 15 ते 20 फळे लागलेली आहेत. तर एका झाडातून 20 ते 25 किलो डाळिंब मिळणार आहे. डाळिंबाची लागवड करण्यासाठी एका एकराला दीड ते दोन लाख रुपये खर्च आला आहे, तर सर्व खर्च वजा करून शेतकरी देविदास चव्हाण यांना सहा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे.
advertisement
डाळिंबाच्या रोपांवर तेल्या, करपा, कुजवा आणि डाग या रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. हा रोग डाळिंबावर येऊ नये म्हणून चव्हाण यांनी वेळोवेळी फवारणी करून रोगांपासून डाळिंबाचे संरक्षण केले आहे. व्यापारी देविदास यांच्या शेतामध्ये येऊन डाळिंबाची पाहणी करून खरेदी करतात किंवा सोलापूर, पुणे, मुंबई, या ठिकाणी विक्रीसाठी पाठवत आहेत. मुंबईतील एका व्यापाऱ्याने देविदास चव्हाण यांची डाळिंबाची बाग पाहिली असून 105 रुपये किलो दराने मागणी केली आहे. डाळिंब पिकाची लागवड केल्यावर त्याची काळजी वेळोवेळी घेतली तर डाळिंबातून सुद्धा अधिक उत्पन्न आपल्याला मिळू शकते, असा सल्ला शेतकरी देविदास चव्हाण यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story: एका एकरात केली 340 झाडांची लागवड, शेतकऱ्याला 6 लाख उत्पन्न, असं काय केलं?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement