Sitafal Price : सीताफळाचा गोल्डन हंगाम, तब्बल 800 रुपयांनी घसरले कॅरेट दर, कारण काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
हे दर तब्बल 800 रुपयांनी घसरून 100 ते 200 रुपये प्रति कॅरेट एवढे खाली घसरले आहेत.
जालना : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या सर्वदूर पावसामुळे सीताफळांच्या दरांमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतंय. दिवाळी दिवशी फळांना 800 ते 1000 रुपये प्रति कॅरेट एवढा दर मिळत होता, परंतु आता हे दर तब्बल 800 रुपयांनी घसरून 100 ते 200 रुपये प्रति कॅरेट एवढे खाली घसरले आहेत.
जालना शहरातील फळबाजारामध्ये वेगवेगळ्या फळांची मोठ्या प्रमाणावर आवक होते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सीताफळ बागांची लागवड केली आहे. कमी पाणी आणि तग धरणारे पीक म्हणून शेतकरी याकडे पाहत होते. परंतु सीताफळाचे दर गडगडल्याने वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सीताफळांना झाडावरच सडू देणं पसंत केलं आहे. बालानगर सीताफळांचा हंगाम संपला आहे.
advertisement
तर सुपर गोल्डन आणि इतर वनाची सीताफळ बाजारात विक्रीसाठी येत आहेत. ढगाळ हवामानामुळे या सीताफळांमध्ये अळी निघण्याचे प्रमाण वाढते, यामुळे विक्रेते आणि खरेदीदार सावधपणे खरेदी करतात. याचाच परिणाम दरावर होत आहे. त्याचबरोबर पावसाळी वातावरणामुळे मागणी देखील मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
advertisement
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 07, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Sitafal Price : सीताफळाचा गोल्डन हंगाम, तब्बल 800 रुपयांनी घसरले कॅरेट दर, कारण काय?

