advertisement

240500000000 तुम्ही फक्त आकडे मोजा! Gold ETF ने स्टॉकमध्ये पैसे लावणाऱ्यांना फोडला घाम

Last Updated:

जानेवारीत गोल्ड आणि सिल्वर ETFमध्ये ३३,५०३ कोटींची विक्रमी गुंतवणूक झाली, इक्विटी फंडपेक्षा जास्त. वर्ल्ड गोल्ड काउंसिल, रोचन पटनायक, वरुण गुप्ता यांचा सल्ला सुरक्षित गुंतवणुकीसाठी.

News18
News18
सोन्या चांदीचे दर प्रचंड अस्थिर आहेत. कधी ५ हजारने वधारतात तर त्यापेक्षा तीनपटीनं खाली कोसळत आहेत. अनेकांनी आपलं प्रॉफिट बुकिंग काढून घेतलं आहे. मात्र त्यातही काहींनी अजूनही आशा सोडली नाही. मागच्या काही महिन्यात जेवढं शेअर मार्केटने नफा मिळवून दिला नाही तेवढा सोन्या चांदीच्या म्युच्युअल फंड, SIP आणि ETF ने मिळवून दिला आहे. आता जी काही गुंतवणूक होत आहे ते आकडे पाहूनच आकडी यायची वेळ आली आहे. लोक सोनं चांदीचे अतिरिक्त दागिने खरेदी करण्यापेक्षा त्यामध्ये गुंतवणूक करण्यावर अधिक भर देत आहेत.
एकेकाळी शेअर बाजारातील म्युच्युअल फंडच्या मागे धावणारा भारतीय गुंतवणूकदार आता सोन्या-चांदीकडे आकर्षित झाला. जानेवारी महिन्यात सोन्या-चांदीच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक पहिल्यांदाच इक्विटी म्युच्युअल फंडांच्या तुलनेत अधिक झाली आहे. जागतिक अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणुकीची ओढ यामुळे सोन्याने इक्विटीला मागे सोडलं आहे. इतकंच नाही शेअर मार्केट आणि इक्विटी म्युच्युअल फंडच्या तुलनेत इथे लोकांची जास्त पसंती आणि रिटर्न मिळण्याच्या उद्देशानं पैसे गुंतवत आहेत.
advertisement
आकडेवारी काय सांगते?
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारी महिन्यात गोल्ड आणि सिल्वर ईटीएफमध्ये एकूण ३३,५०३ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली. याउलट, इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये केवळ २४,०१३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एकट्या सोन्यात २४,०५० कोटींची गुंतवणूक झाली, जी डिसेंबरच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. चांदीमध्येही ९,४६३ कोटी रुपयांचा मोठा ओघ आला आहे.
advertisement
शेअर बाजारात सुस्ती; लार्ज-कॅपमध्ये वाढ, पण स्मॉल-कॅप घटले
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. डिसेंबरच्या तुलनेत इक्विटी फंडांमधील गुंतवणूक १४ टक्क्यांनी घटली आहे. विशेषतः मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडांमधील ओघ कमी झाला असून, गुंतवणूकदारांनी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या लार्ज-कॅप फंडांना पसंती दिली आहे. मात्र, एसआयपीमधील गुंतवणूक ३१,००२ कोटींवर स्थिर राहिल्याने सामान्य गुंतवणूकदारांचा बाजारावरचा विश्वास अजूनही टिकून असल्याचे दिसते.
advertisement
तज्ज्ञांचं म्हणणं काय, थांबावं की पैसे गुंतवावे?
वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या मते, जानेवारीत झालेली गुंतवणूक ही देशातील सोन्याच्या एकूण मालमत्तेच्या (AUM) १२.५% आहे. 'चॉइस एएमसी'चे रोचन पटनायक यांच्या मते, बाजारातील चढ-उतार आणि Geo-political Risk पासून वाचण्यासाठी सोनं हे उत्तम साधन आहे. जेव्हा सोन्याच्या किमतीत थोडी घट झाली, तेव्हा गुंतवणूकदारांनी ती खरेदीची संधी मानली. ग्रो म्युच्युअल फंड'चे सीईओ वरुण गुप्ता म्हणतात की, सोने आणि चांदी आता केवळ दागिने राहिले नसून ते मुख्य प्रवाहातील आर्थिक गुंतवणूक म्हणून स्वीकारले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या १० ते १५ टक्के हिस्सा सोने किंवा चांदीमध्ये गुंतवू शकता.
advertisement
डिस्क्लेमर: या बातमीमध्ये दिलेली माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने आहे. हे कोणत्याही प्रकारचे गुंतवणूक सल्ले नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक फायद्यासाठी किंवा नुकसानीसाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/मनी/Share Market/
240500000000 तुम्ही फक्त आकडे मोजा! Gold ETF ने स्टॉकमध्ये पैसे लावणाऱ्यांना फोडला घाम
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement