TRENDING:

कृषी हवामान : शेतकऱ्यांची चिंता वाढली! 9 जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, पिकांच्या खतं फवारणीचे नियोजन कसं कराल?

Last Updated:

Maharashtra Weather News : राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा विजांसह पुनरागमन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, पावसाच्या उघडपीनंतर सध्या राज्यात उन्हाचा तडाखा आणि उकाडा प्रचंड वाढलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा विजांसह पुनरागमन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, पावसाच्या उघडपीनंतर सध्या राज्यात उन्हाचा तडाखा आणि उकाडा प्रचंड वाढलेला आहे. हवामान विभागाने आज (ता. 4 ऑगस्ट) पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
maharashtra weather update
maharashtra weather update
advertisement

पावसाच्या स्थितीचा आढावा

सध्या मॉन्सूनच्या मान्सून पट्ट्याची रचना अमृतसरपासून चंडीगड, श्यामली, शहाजहानपूर, लखनऊ, चापरा, बंकुरा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. याशिवाय, बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरात समुद्र सपाटीपासून सुमारे 4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंतही हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळे पावसासाठी योग्य हवामान तयार झाले आहे.

advertisement

उन्हाचा चटका वाढला

राज्यात गेल्या 24 तासांत काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली असली तरी, एकंदर पावसाने विश्रांती घेतल्याने उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागपूरमध्ये तब्बल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून इतर भागातही उकाडा जाणवतो आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

आज कोणत्या जिल्ह्यांत अलर्ट?

 येलो अलर्ट  - सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

हलक्या सरींची शक्यता असलेले जिल्हे - रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली.

शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला

खरीप पिकांवर अलीकडील पावसाचा परिणाम दिसून येत आहे. आता खते व फवारणी करताना शेतकऱ्यांनी खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

advertisement

1) फवारणीचे वेळापत्रक पावसाच्या शक्यतेनुसार ठरवा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळनंतरच फवारणी करा.

2) विजांचा अंदाज असल्यास फवारणी टाळावी, कारण वीज पडण्याचा धोका असतो.

3) पावसामुळे खत धुऊन जाऊ नये यासाठी जमिनीचा ओलावा पाहूनच फवारणी करा.

4) फवारणीनंतर 24 तासांत पाऊस पडण्याची शक्यता असल्यास ती थोडी पुढे ढकला.

5) सेंद्रिय खते आणि बायोपेस्टिसाइड्स वापरण्यावर भर द्या, जे पावसाने कमी धुतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

दरम्यान, राज्यात सध्या हवामान अनिश्चित व अस्थिर असल्यामुळे नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे. येलो अलर्ट असलेल्या भागांतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे आणि विजांच्या सळसळाटाच्या वेळी बाहेर जाणे टाळावे.

मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : शेतकऱ्यांची चिंता वाढली! 9 जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, पिकांच्या खतं फवारणीचे नियोजन कसं कराल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल