कांद्याचे दर किती?
आज 5 एप्रिल रोजी राज्याच्या मार्केटमध्ये 36 हजार 812 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये 1003 क्विंटल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास 917 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी बाजारभाव मिळाला. तसेच बाजारातील उन्हाळी कांद्याचा सरासरी भाव 226 ते 1326 रुपये दरम्यान राहिला. लोकल कांद्याचा बाजारभाव 800 ते 917 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
advertisement
Farmer Success: अर्धा एकर शेती, 90 दिवसांत लखपती, अकरावीच्या विद्यार्थ्याची कमाल, काय केलं?
संभाजीनगरमध्ये लिंबूला भाव
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 385 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 349 क्विंटल लिंबूस 5200 ते 8000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 33 क्विंटल लिंबूस 11000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
द्राक्षाचा दर
राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून मार्केटमधील द्राक्षाची आवक कमी आहे. आज 133 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 97 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 6500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपपती संभाजीनगर बाजारात आवक झालेल्या 34 क्विंटल द्राक्षास 8500 प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
केळीची आवक
मुंबई मार्केटमध्ये 19 क्विंटल कच्च्या केळीची आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2400 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. राज्याच्या मार्केटमध्ये केळीची केवळ 159 क्विंटल आवक पुणे मार्केटमध्ये झाली. त्यास 2350 रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम द्राक्षासह केळी उत्पादक शेतकऱ्यांवर होत आहे. परिणामी केळीच्या उत्पादन खर्चावर 30 टक्के वाढ झाली. तसेच निर्यात बंद असल्याने क्विंटलमागे 800 रुपयांपर्यंत फटका बसत असल्याचे केळी शेतकरी सांगत आहेत.





