TRENDING:

2 गुंठ्यात व्यवसायाची उभारणी, शेतीला जोडधंदा म्हणून सुरु केले गावरान कोंबडी पालन, आता लाखोंची कमाई

Last Updated:

कुक्कुटपालन हा व्यवसाय करत भरपूर शेतकऱ्यांनी स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावातील शेतकरी कल्याण घोडके यांनीही शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म व्यवसायाची सुरुवात केली आहे. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत पवार, प्रतिनिधी 
advertisement

बीड : सध्या शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी वेगवेगळे व्यवसाय करत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस कुक्कुटपालन या व्यवसायात अधिक प्रमाणात वाढ होत आहे. कुक्कुटपालन हा व्यवसाय करत भरपूर शेतकऱ्यांनी स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावातील शेतकरी कल्याण घोडके यांनीही शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म व्यवसायाची सुरुवात केली आहे. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.

advertisement

शेतकरी कल्याण घोडके यांचा सुरुवातीचा प्रवास

शेतकरी कल्याण घोडके यांना अडीच एकर शेती असल्यामुळे तीन वर्षांपूर्वी कमी शेतीतून पुरेसं उत्पन्न मिळवण्यात अडचणी येत होत्या. पारंपरिक शेतीवर अवलंबून राहिल्यास घर चालवणं कठीण होईल हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी विविध पर्यायांचा अभ्यास केला आणि गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा व्यवसाय कमी जागेत कमी भांडवलात आणि कमी जोखमीत सुरू करता येतो हे त्यांनी ओळखलं.

advertisement

दोन गुंठ्यात व्यवसायाची उभारणी

घोडके यांनी सुरुवातीला फक्त दोन गुंठे जागेत गावरान कोंबडी पालनाला सुरुवात केली. यासाठी त्यांना 50 हजार रुपये खर्च आला.  त्यांनी गावरान कोंबड्यांसाठी योग्य निवारा तयार केला. जेथे कोंबड्यांना नैसर्गिक वातावरण मिळेल याची काळजी घेतली. कोंबड्यांसाठी पोषणमूल्यपूर्ण चारा तयार करताना त्यांनी स्थानिक धान्य, गवत आणि शेतीतील उरले सुरले साहित्य यांचा वापर केला.

advertisement

दर्जेदार अंडी आणि मांसाचा व्यवसाय

गावरान कोंबड्यांची अंडी आणि मांस यांना नेहमीच मागणी असते. त्यांच्या नैसर्गिक चवीमुळे बाजारात उच्च दर मिळतो. घोडके यांची उत्पादने दर्जेदार असल्याने स्थानिक बाजारपेठेत त्यांना कायम मागणी असते. सुरुवातीला त्यांनी लहान प्रमाणात विक्री सुरू केली. परंतु हळूहळू ग्राहकांचा विश्वास जिंकून व्यवसाय वाढवला. घोडके यांचा हा व्यवसाय आता वर्षाला दीड ते दोन लाख रुपयांचं उत्पन्न देतो. कमी खर्चात आणि कमी क्षेत्रात एवढं उत्पन्न मिळवल्यामुळे ते परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

advertisement

आव्हानं आणि उपाय

कोंबडी पालन व्यवसायात वेळोवेळी विविध आव्हानं येतात. जसे की कोंबड्यांचे आजार, बाजारातील चढ-उतार आणि पोषण व्यवस्थापन. मात्र घोडके यांनी यासाठी वेळोवेळी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला. कोंबड्यांच्या रोगप्रतिकार शक्तीला वाढवण्यासाठी त्यांनी नैसर्गिक उपायांचा अवलंब केला.

इतर शेतकऱ्यांसाठी संदेश

कल्याण घोडके यांचा अनुभव इतर लहान शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणा ठरतो. कमी जागेत आणि कमी भांडवलात यशस्वी व्यवसाय उभारता येतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या मते पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता पूरक व्यवसाय शोधणं गरजेचं आहे. योग्य नियोजन आणि चिकाटी असेल तर कुठलाही व्यवसाय यशस्वी करता येतो.

मराठी बातम्या/कृषी/
2 गुंठ्यात व्यवसायाची उभारणी, शेतीला जोडधंदा म्हणून सुरु केले गावरान कोंबडी पालन, आता लाखोंची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल