TRENDING:

ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर

Last Updated:

Agriculture News : गावचा विकास हा ग्रामपंचायतीच्या निर्णयांवर आणि कामकाजावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. मात्र अनेक वेळा विकास कामांमध्ये भ्रष्टाचार, अपारदर्शक व्यवहार किंवा निधीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर येतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गावचा विकास हा ग्रामपंचायतीच्या निर्णयांवर आणि कामकाजावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. मात्र अनेक वेळा विकास कामांमध्ये भ्रष्टाचार, अपारदर्शक व्यवहार किंवा निधीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर येतात. त्यामुळे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? आणि त्यावर कारवाईसाठी काय कायदेशीर मार्ग आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
agriculture news
agriculture news
advertisement

भ्रष्टाचाराची लक्षणं कशी ओळखावीत?

कामांचा दर्जा आणि वास्तव तपासा

जर एखाद्या विकासकामासाठी (उदा. रस्ता, नाली, टाकी, शौचालय, वीजसुविधा) भरपूर रक्कम खर्च दाखवण्यात आली असेल पण प्रत्यक्षात काम अपूर्ण, निकृष्ट दर्जाचं किंवा अस्तित्वातच नसेल, तर तो स्पष्ट भ्रष्टाचाराचा लक्षण असू शकतो.

नियमित ग्रामसभा होत नाही

ग्रामसभा ही नागरिकांना माहिती देण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी असते. जर ग्रामसभा नियमित होत नसेल किंवा केवळ नावापुरती होत असेल, तर माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

advertisement

निविदा प्रक्रिया अपारदर्शक असते

कोणतंही काम देण्यासाठी निविदा (Tender) प्रक्रिया बंधनकारक आहे. जर काम एकाच ठेकेदाराला वारंवार मिळत असेल, किंवा प्रक्रिया गुप्ततेत होत असेल, तर त्यामागे आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता असते.

खर्चाचे तपशील ग्रामपंचायतीत उपलब्ध नाहीत

ग्रामपंचायत कार्यालयात खर्चाचे अंदाजपत्रक, मंजूर निधी, कामाचे बिल, मस्टर रोल यांसारखी सर्व कागदपत्रे नागरिकांना दाखवण्याची जबाबदारी आहे. ती माहिती देण्यास टाळाटाळ केली गेल्यास प्रश्न उपस्थित होतो.

advertisement

मनरेगा कामांमध्ये गैरव्यवहार

मनरेगा अंतर्गत फर्जी नोंद, माणसे न ठेवता काम झाल्याचे दाखवणे, मजुरांना पूर्ण मजुरी न देणे असे प्रकार होत असल्याचे अनेक वेळा दिसून येते.

नागरिकांचे काय अधिकार आहेत?

माहितीचा अधिकार

तुम्ही RTI अंतर्गत ग्रामपंचायतीकडून कोणत्याही कामाचा तपशील, खर्चाचे हिशोब, लाभार्थी यादी, मस्टर रोल, निविदा माहिती मागवू शकता.

ग्रामसभा मध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार

advertisement

प्रत्येक ग्रामसभेत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि खुल्या चर्चेत भाग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.

लोकायुक्त, जिल्हाधिकारी किंवा बीडीओकडे तक्रार

तुम्हाला वाटत असेल की भ्रष्टाचार झाला आहे, तर तुम्ही लेखी तक्रार लोकायुक्त, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा तालुका गटविकास अधिकाऱ्याकडे (BDO) करू शकता.

ऑडिट आणि सामाजिक लेखापरीक्षण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

सरकार दरवर्षी ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण करते. तुम्ही सामाजिक लेखापरीक्षणाची मागणी करू शकता. यात सामान्य लोकच कागदपत्र तपासतात.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल