TRENDING:

APMC Market: लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा

Last Updated:

नागपूर मार्केटमध्ये 1003 क्विंटल पांढर्‍या कांद्याची आवक झाली. त्यास मिळालेला 1329 रुपये सर्वाधिक सरासरी बाजारभाव ठरला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: आज 4 एप्रिल रोजी राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 17 हजार 015 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये 1003 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक झाली. त्यास मिळालेला 1329 रुपये सर्वाधिक सरासरी बाजारभाव ठरला. तसेच बाजारातील लाल कांद्याचा सरासरी भाव 700 ते 1292 रुपये दरम्यान राहिला. उन्हाळी कांद्याचा बाजारभाव 942 ते 1300 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
advertisement

लिंबूची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 608 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 344 क्विंटल लिंबास 3000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल लिंबास 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

द्राक्ष आवक

राज्याच्या मार्केटमध्ये द्राक्ष आवक स्थिर आहे. आज 526 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 350 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 9600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच धाराशिव बाजारात आवक झालेल्या 3 क्विंटल द्राक्षास 3500 प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला.

advertisement

केळीची आवक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

मुंबई मार्केटमध्ये 19 क्विंटल कच्च्या केळीची आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2400 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. राज्याच्या मार्केटमध्ये केळीची केवळ 272 क्विंटल एकूण आवक राहिली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 160 क्विंटल केळीची सर्वाधिक आवक झाली. त्यास 1500 रुपये बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल