advertisement

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सोयाबीनचं मार्केट कडाडलं, दरात मोठी वाढ सध्याचे बाजारभाव काय?

Last Updated:

Soyabean Market Update : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चढ-उतार दिसून येत असून, गेल्या दोन दिवसांतील आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना काही ठिकाणी चांगला दर मिळत असला तरी काही बाजारांमध्ये दर घसरल्याचे चित्र आहे.

Soyabean Market Update
Soyabean Market Update
मुंबई : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांतील आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना काही ठिकाणी चांगला दर मिळत असला तरी काही बाजारांमध्ये दर घसरल्याचे चित्र आहे. ३ आणि ४ एप्रिल २०२६ रोजीच्या बाजारभावावर नजर टाकली असता, सोयाबीनचा सर्वसाधारण दर साधारणपणे ५१०० ते ५६०० रुपयांच्या दरम्यान असल्याचे दिसून येते.
४ एप्रिलचे बाजारभाव
४ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर-हिवरगाव बाजार समितीत ५२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे किमान दर ५४०० रुपये तर कमाल दर ५६०० रुपये होता. सर्वसाधारण दर ५५०० रुपये नोंदवण्यात आला.
नागपूर बाजारात १७९ क्विंटल आवक झाली असून, येथे किमान दर ४८०० रुपये तर कमाल ५७०० रुपये मिळाला. सरासरी दर ५४७५ रुपये राहिला. पिंपळगाव (औरंगपूर भेंडाळी) येथे पिवळ्या सोयाबीनला थेट ५६०० रुपयांचा दर मिळाला.
advertisement
३ एप्रिलचे बाजारभाव
३ एप्रिलच्या आकडेवारीनुसार, लातूर बाजार समितीत सर्वाधिक १९,४४० क्विंटल सोयाबीनची मोठी आवक झाली. येथे किमान दर ५४८० रुपये, कमाल दर ५६९१ रुपये आणि सरासरी दर ५५०० रुपये होता.
सोलापूर बाजारात ७० क्विंटल आवक झाली असून, येथे सर्वाधिक ५७०० रुपयांचा दर मिळाला, तर सरासरी दर ५६१५ रुपये राहिला. अकोला बाजारात ६४८ क्विंटल आवक झाली असून, सरासरी दर ५५०० रुपये नोंदवण्यात आला.
advertisement
काही बाजारांत दर घसरले
काही बाजार समित्यांमध्ये दरात मोठी घसरणही पाहायला मिळाली. पैठण येथे केवळ १ क्विंटल सोयाबीनला ३२०० रुपयांचा दर मिळाला. वरोरा-शेगाव बाजारात किमान दर २४०० रुपये इतका खाली आला आणि सरासरी दर ४००० रुपये राहिला. येवला बाजारातही किमान दर ४५०१ रुपये नोंदवण्यात आला.
चांगले दर मिळालेले बाजार
बार्शी आणि पिंपळगाव (पालखेड) या बाजारांमध्ये तुलनेने चांगले दर मिळाले. बार्शीत ५६०० रुपयांचा स्थिर दर होता, तर पिंपळगाव (पालखेड) येथे हायब्रीड सोयाबीनला सरासरी ५५६० रुपये दर मिळाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सोयाबीनचं मार्केट कडाडलं, दरात मोठी वाढ सध्याचे बाजारभाव काय?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement