जालना - मागील 8 दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 3500 ते 4000 क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. यामध्ये सोयाबीनच्या गुणवत्तेनुसार 3000 रुपये प्रतिक्विंटल ते 4600 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. पावसामुळे सोयाबीनची गुणवत्ता खराब झाली असल्याने सोयाबीनच्या दरात मोठी तफावत पाहायला मिळतील. जालना बाजार समितीमध्ये सोयाबीन दराची स्थिती काय आहे आणि भविष्यात सोयाबीनचे दर कसे राहतील, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
advertisement
परतीच्या पावसामुळे सोयाबीनच्या दर्जामध्ये घसरण झाली आहे. यामुळे सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. त्याचबरोबर जास्त आर्द्रता असलेली सोयाबीन बाजारात येत आहे. अतिशय कमी गुणवत्ता असलेल्या सोयाबीनचे दर 3000 रुपये ते 4000 रुपये प्रति क्विंटल असे आहेत. तर यापेक्षा चांगल्या गुणवतीची सोयाबीन 4000 रुपये प्रतिक्विंटल ते 4600 रुपये प्रतिक्विंटल या दराने विक्री होत आहे.
Sindhudurg News : परतीच्या पावसाचा भातशेतीला मोठा फटका, पिकं जमिनीदोस्त; डोळ्यात अश्रू आणणारी दृश्य
भविष्यात सोयाबीनच्या दर्जामध्ये सुधारणा झाल्यास शेतकऱ्यांच्या हातामध्ये चार पैसे शिल्लक पडू शकतात. पावसाने उघडीत दिल्यास बाजारात मोठ्या प्रमाणात आवक येण्यास सुरुवात होईल. सध्या तरी मागील 8 दिवसांपासून बाजार स्थिर असून 3000 ते 4600 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळतोय, असे व्यापारी संजय कानडे यांनी सांगितले.
येत्या काळात नाफेड मार्फत देखील सोयाबीनची खरेदी सुरू होईल. तसेच तेलाच्या बाजारावर देखील सोयाबीनचे गणित अवलंबून राहील. नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू झाल्यानंतर घरामध्ये 200 ते 300 रुपयांची सुधारणा होऊ शकते. तसेच तेलाच्या दरात सुधारणा झाल्यानंतरही सोयाबीनमध्ये तेजी पाहायला मिळू शकते, अशी शक्यता जालन्यातील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.