ट्रॅक्टर अनुदान योजनेचे वैशिष्ट्ये
सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 5 लाख रुपये पर्यंतचे अनुदान देते.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% आणि 40% अनुदान अशा दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये मिळते.
या योजनेचा मुख्य उद्देश अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत मदत करणे आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रेशन कार्ड
advertisement
रहिवासी दाखला
सातबारा उतारा
जमिनीचा अकार
मोबाइल नंबर
ई-मेल आयडी
पासपोर्ट आकाराचे फोटो
जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
अर्ज प्रक्रिया कशी कराल?
सर्वप्रथम शेतकऱ्यांना या योजनेसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर नोंदणी करावी लागते. महाडीबीटी हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल आहे जिथे ऑनलाईन अर्ज करून अनुदानासाठी अर्ज करता येतो.अर्ज सादर केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचे लाभ मिळवता येतात.
दरम्यान, राज्य सरकारची ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे ज्यामुळे ते आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतात. ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीची अनेक कामे अधिक जलद आणि सोपी होतात. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शेतीत सुधारणा करावी.
