राजूभाई गगजीभाई राठोड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते भावनगर जिल्ह्याच्या शिहोर तालुक्यातील ढाकणकुंडा गावातील रहिवासी आहेत. आधी ते हिऱ्याच्या व्यापाराशी संबंधित होते आणि सुरतमध्ये काम करायचे. मात्र, त्यांनी नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यामध्ये त्यांनी 8 वर्षांपूर्वी पशुपालन करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त 2 म्हशी होत्या. मात्र, आज त्यांच्याकडे तब्बल 80 म्हशी आहेत आणि ते दिवसाला 400 लीटरपेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. यासोबतच ते दुधापासून मिठाईसुद्धा तयार करुन ते विकत आहेत. त्यांनी 6 जणांना रोजगारही दिला आहे. तसेच आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची कमाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
संघर्ष कमी होत नाही, संकट आणखी वाढणार, शनीचं आक्रमण असं ओळखा!
पशुपालक राजूभाई गगजीभाई राठोड यांनी सांगितले की, “मी फक्त प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. आधी मी सुरतमध्ये हिऱ्याच्या व्यापारात काम करायचो. मात्र, मला नंतर माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. म्हणून मी माझ्या गावी परतलो. इथे आल्यानंतर मी माझ्या घरासाठी म्हैस विकत घेतली. त्यानंतर दुधाच्या विक्रीतून होणारा नफा पाहून म्हशींसाठी तबेला बांधण्याचा निर्णय घेतला. सुमारे 8 ते 9 वर्षांपूर्वी मी हा पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला. तेव्हा माझ्याकडे वळ दोन म्हशी होत्या. यामध्ये आज माझ्याकडे जातीच्या 80 म्हशी आहेत,” असे ते म्हणाले.
तबेल्यात म्हशींना पाणी देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. यामुळे त्यांची काळजी घेणे सोपे होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 2 म्हशींपासून सुरू केलेला व्यवसाय आज 8 ते 9 वर्षात 80 म्हशींपर्यंत पोहोचला असून ते महिन्याला तब्बल 4 लाख रुपयांची कमाई करत आहेत. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.