ज्योती यांनी एमए बीएडमधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्याआधारित नोकरी देखील मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कालांतराने आणि काही अडचणींमुळे त्यांना नोकरी करता जमले नाही. तरी देखील त्या शांत बसल्या नाहीत. काही ना काही घरी बसून करतच राहिल्या. ब्युटी पार्लर देखील त्यांनी सुरू केले. आणि काहीच काळात कोरोनामुळे त्यांच्या हा उद्योग त्यांना बंद करावा लागला. ज्योती यांना लहानपणापासूनच झाडे लावण्याची आवड असल्याने त्या घरात वेगवेगळे झाडांचे रोप लावत असतं. या माध्यमातून त्यांनी मशरूम देखील घरात उगवून ते विक्री करण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
शेती परवडत नाही? 20 वर्षाच्या तरुणाकडं बघा, एक एकर भुईमुगातून उसापेक्षा जास्त कमाई!
ज्योती यांना यूट्यूब पाहत असताना केशर कसे उगवल्या जाते हा व्हिडिओ मिळाला आणि त्यानंतर आपण देखील आपल्या घरी हा प्रयोग करू शकतो असा विचार करून यावर संपूर्ण अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर त्यांच्या पतीला हा विचार सांगितला. त्यांनी देखील त्यांच्या कल्पनेला पुढाकार दिल्यानंतर त्यांनी केशर शेती करण्याचे ठरविले.
या शेतीसाठी लागणारे केशराचे रोप फक्त काश्मीर साईडलाच मिळत असल्याने त्यांनी काश्मीरला जाऊन ही रोपे नाशिकमध्ये आणली. त्यानंतर घरातीलच एका खोलीत ही रोपे योग्य पद्धतीने लावण्यास सुरुवात केली, असं ज्योती यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
केशर शेती ही अशी शेती आहे की त्यात तुम्हाला फक्त एक वेळेसच गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर ही रोपे आपोआप वाढत असतात. पहिल्या वेळेस मी यात 5 लाखांची गुंतवणूक केली आणि पहिल्याच वेळेस केशरच्या माध्यमातून मला 2 लाखांचे उत्पन्न झाले असल्याचे ज्योती यांनी सांगितले.
तसेच यासाठी त्यांनी परिपूर्ण अभ्यास केला. यासाठी लागणारी सर्व माहिती त्यांच्याकडे आल्याने त्यांनी इतरांना देखील या शेतीसाठी लागणारी मदत करण्याचे कार्य सुरू केले आहे. कोणत्याही महिलेला या क्षेत्रात येण्याची आवड असल्यास त्यांना हवे ते मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळणार आहे. तसेच त्यांचे फेसबुक, यूट्यूबवर देखील ड्रायवन अग्रो या नावाने पेज आहे त्यावर अधिक माहिती ही त्यांनी दिली आहे.