TRENDING:

तारीख ठरली! PM Kisan चा २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार

Last Updated:

PM Kisan Yojana : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत २१ हप्ते वितरित झाले असून, आता शेतकरी २२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जमा झाला होता. त्यामुळे पुढील हप्ता कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
pm kisan yojana
pm kisan yojana
advertisement

२२ वा हप्ता कधी जमा होणार?

पीएम किसान योजनेची सुरुवात २०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्या वेळी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल होते, तर या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. ही योजना आज जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजना मानली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही प्रशासन पातळीवर तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

advertisement

हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागणार?

२२ वा हप्ता मिळण्याआधी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

e-KYC पूर्ण असणे अनिवार्य

भू-सत्यापन (Land Verification) पूर्ण असणे

बँक खाते आधारशी लिंक असणे

बँक खात्याचा IFSC कोड आणि खाते क्रमांक अचूक असणे

या पैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण असल्यास हप्ता अडकू शकतो.

advertisement

या शेतकऱ्यांना २२ वा हप्ता मिळणार नाही

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप e-KYC केलेली नाही, भू-सत्यापन अर्धवट ठेवले आहे, बँक खात्याची चुकीची माहिती दिली आहे, आधार क्रमांक किंवा नावातील स्पेलिंग चुकीचे आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात २२ वा हप्ता जमा होणार नाही. या त्रुटी दुरुस्त केल्याशिवाय लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

advertisement

Farmer ID नसल्यास अडचण

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आदी राज्यांमध्ये Farmer ID अनिवार्य करण्यात येत आहे. या राज्यांमध्ये शिबिरे आणि सेवा केंद्रांच्या माध्यमातून फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Farmer ID नसलेल्या शेतकऱ्यांनाही पीएम किसान योजनेच्या लाभात अडचणी येऊ शकतात.

पेमेंट स्टेटस कसे तपासाल?

advertisement

शेतकरी खालील पद्धतीने आपल्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.होमपेजवरील Know Your Status किंवा Farmer Corner वर क्लिक करा.आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.“Get Data” वर क्लिक करा.स्क्रीनवर पेमेंट स्टेटस दिसेल

काही शेतकऱ्यांना ४,००० रुपये मिळणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मालामाल करणारी रताळी शेती, 5 एकरांत 750 क्विंटल उत्पादन, शेतकऱ्याला 8 लाख नफा
सर्व पहा

ज्या शेतकऱ्यांना अद्याप २१ वा हप्ता मिळालेला नाही आणि त्यांनी आता सर्व अटी पूर्ण केल्या असतील, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा व २२ वा हप्ता मिळून एकूण ४,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/कृषी/
तारीख ठरली! PM Kisan चा २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल