TRENDING:

PM Kusum Yojana : पीएम कुसुम सौर पंप योजना काय आहे? पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया, जाणून घ्या

Last Updated:

PM Kusum Yojana Update : पीएम कुसुम सौर अनुदान योजना ही केंद्र सरकारने देशभरातील शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. ज्यामध्ये शेतकरी बांधव त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी अर्ज करू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पीएम कुसुम सौर अनुदान योजनेअंतर्गत, सौर सिंचन पंप बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून 90% अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत, 35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सौर सिंचन पंप बसवल्यानंतर शेतकरी बांधवांना इंधन किंवा विजेवर चालणारे सिंचन पंप वापरण्याची गरज नाही. कारण सरकारच्या कुसुम सौर अनुदान योजनेंतर्गत अर्ज करून सौर पंपांचे फायदे मिळू शकतात. यामुळे इंधन आणि वीज बिलापासूनही बचत होते. मग आता या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत? अर्ज कसा करावा? या बद्दलची माहिती जाणून घेऊ या
पीएम कुसुम सौर पंप योजना काय आहे?
पीएम कुसुम सौर पंप योजना काय आहे?
advertisement

पीएम कुसुम सौर अनुदान योजना काय आहे?

पीएम कुसुम सौर अनुदान योजना ही केंद्र सरकारने देशभरातील शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. ज्यामध्ये शेतकरी बांधव त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी अर्ज करू शकतात. या सौरपंपावर केंद्र सरकार शेतकऱ्यांना 90% अनुदान देते आणि फक्त 10% खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. ही अनुदानाची रक्कम 2 अश्वशक्तीपासून ते 5 अश्वशक्तीपर्यंतच्या सौरपंपांसाठी दिली जाते. सरकारने या योजनेअंतर्गत 35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

advertisement

योजनेच्या पहिल्या टप्प्यात, सरकार डिझेल पेट्रोलवर चालणाऱ्या 17.5 लाख पंपांचे आधुनिकीकरण करून त्यांचे सौर पंपांमध्ये रूपांतर करणार आहे. म्हणजेच जे शेतकरी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे सिंचन पंप वापरत होते ते आता सौरऊर्जेच्या मदतीने पंप चालवू शकणार आहेत. त्यामुळे त्यांचा इंधन आणि वीज बिलाचा खर्च वाचणार असून मोफत विजेचा लाभ मिळणार आहे.

advertisement

योजनेचे पात्रता निकष काय आहेत?

पीएम कुसुम सौर अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांचा गट,सहकारी संस्था,पाणी ग्राहक संघटना,शेतकरी उत्पादक संघटना, आणि देशातील सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

प्रधानमंत्री कुसुम सौर अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे

दोन पासपोर्ट साइज फोटो

advertisement

पत्त्याचा पुरावा जसे की आधार कार्ड, मतदान ओळखपत्र इ.

बँक पासबुक

जमिनीशी संबंधित कागदपत्रे

मोबाईल नंबर

शिधापत्रिका

अर्ज करण्याची प्रक्रिया 

सर्वप्रथम तुम्हाला पीएम कुसुम सौर अनुदान योजनेच्या https://pmkusum.mnre.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अधिकृत वेबसाइटचे मुख्यपृष्ठ ओपन झाल्यानंतर प्रथम आपले राज्य निवडा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

निवड केल्यानंतर, "ऑनलाइन नोंदणी" पर्यायावर क्लिक करा.क्लिक केल्यानंतर, तुम्हाला योजनेचा अर्ज दिसेल, त्यामध्ये खालील माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करा जसे की, नाव, पत्ता,आधार क्रमांक, मोबाईल नंबर इ. विविध माहिती भरल्यानंतर महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. अपलोड केल्यानंतर, "सबमिट" बटणावर क्लिक करा. मग तुमची नोंदणी पावती प्रिंट करा आणि ती सुरक्षित ठेवा. हे केल्यानंतर, पीएम कुसुम सौर अनुदान योजनेअंतर्गत अर्जाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली जाईल आणि तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल तसेच जमिनीची भौतिक तपासणी केली जाईल. जर तुम्ही योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरलात तर तुमच्या शेतात सौर पंप बसवला जाईल.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
PM Kusum Yojana : पीएम कुसुम सौर पंप योजना काय आहे? पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया, जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल