कुंभ राशी
ज्योतिषशास्त्रानुसार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याच राशीत आधीपासूनच राहू आणि शुक्र विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य-राहू युतीतून ग्रहण योग तयार होणार असून, सूर्य-शुक्र संयोगामुळे शुक्रादित्य योग देखील निर्माण होईल. हे तिन्ही ग्रह एकत्र आल्याने एक शक्तिशाली त्रिग्रही योग घडेल. हा योग १ मार्च २०२६ पर्यंत प्रभावी राहणार असून, त्यानंतर शुक्र मीन राशीत प्रवेश करेल आणि ही युती समाप्त होईल. मात्र, या काळात ५ राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. त्रिग्रही योगामुळे कौटुंबिक आनंद वाढेल आणि घरगुती वातावरण सुखकर राहील. घर, वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदीचे योग संभवतात. प्रभावशाली व्यक्तींशी ओळखी वाढतील. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक प्रगती होण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा ग्रहयोग दिलासादायक ठरणार आहे. कुटुंबातील काही काळापासून चालू असलेल्या समस्या सुटण्याच्या मार्गावर जातील. मानसिक तणाव कमी होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या कमी होतील आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जीवनात सकारात्मक ऊर्जा जाणवेल.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यात सुधारणा होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल आणि एखादी दीर्घकाळची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि समाधानाची भावना निर्माण होईल.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीसाठी उत्तम संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना नफ्यात वाढ अनुभवायला मिळेल.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग आर्थिक मजबुती घेऊन येणार आहे. बचतीत वाढ होईल आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. नातेसंबंधातील गैरसमज दूर होतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. पुरस्कार, सन्मान किंवा पदोन्नतीची शक्यता नाकारता येत नाही.
(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
