मेष (Aries)
मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक व्यवहारात सावध राहा, गुंतवणूक टाळलेली बरी. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील.
वृषभ (Taurus)
आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यावसायिकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन होईल.
advertisement
मिथुन (Gemini)
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. नोकरीत बढतीचे योग आहेत. कोणालाही उसने पैसे देणे टाळा, अन्यथा ते परत मिळण्यास अडचण येईल.
कर्क (Cancer)
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर होतील. नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल, तर आजचा मुहूर्त उत्तम आहे. प्रेमात असलेल्या लोकांसाठी दिवस सुखद असेल.
सिंह (Leo)
तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. मात्र, रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो.
कन्या (Virgo)
आज तुम्हाला काही महत्त्वाची बातमी मिळू शकते. अचानक धनलाभाचे योग आहेत. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. मित्रांच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण होईल. अध्यात्माकडे कल वाढेल.
तूळ (Libra)
आज सावधगिरीने पाऊल उचला. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.
वृश्चिक (Scorpio)
व्यावसायिकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवीन भागीदारीतून लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहील. हनुमान चालीसा वाचणे तुमच्यासाठी शुभ ठरेल.
धनु (Sagittarius)
आज तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत अनुभवाल. अडकलेली देणी वसूल होतील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. वडिलांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मुलांकडून आनंद मिळेल.
मकर (Capricorn)
आज शनीचा प्रभाव तुमच्यावर राहील. कष्टाचे फळ नक्की मिळेल, पण संयम ठेवावा लागेल. वादापासून दूर राहा. जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळण्याचे योग आहेत. प्रवासाचा योग आहे.
कुंभ (Aquarius)
खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. विनाकारण पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र, करिअरमध्ये प्रगती होईल. नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करू शकता. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
मीन (Pisces)
आजचा दिवस धार्मिक कार्यात जाईल. मंदिरात दर्शनासाठी जाल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. अडकलेली कामे गुरुबळाने पूर्ण होतील.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
