आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाढला सोयाबीनचा भाव, तूर आणि कापसाची स्थिती काय? Video

Last Updated:

29 डिसेंबर सोमवार रोजी राज्यातील कृषी बाजारात प्रमुख पिकांच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. कापूस, कांदा, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात आवक झाली.

+
Maharashtra

Maharashtra Krushi Market updates 

अमरावती : 29 डिसेंबर सोमवार रोजी राज्यातील कृषी बाजारात प्रमुख पिकांच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. कापूस, कांदा, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून काही पिकांच्या दरात रविवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत वाढ नोंदवली गेली आहे. विशेषतः कापूस, कांदा आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसून येत असताना तुरीच्या दरातही काहीशी वाढ झाल्याचे चित्र आहे. सोमवारी कापूस, सोयाबीन, कांदा आणि तुरीची आवक किती झाली? भाव किती मिळाला पाहुयात.
कपाशीचे दर सुधारले
कृषी मार्केटमध्ये वेबसाईटवरील सायंकाळी 6.15 वाजताच्या रिपोर्टनुसार, राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 29 हजार 294 क्विंटल कपाशीची आवक झाली. यापैकी अकोला मार्केटमध्ये 9 हजार 502 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास 8010 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. बीड मार्केटमध्ये आवक झालेल्या 608 क्विंटल कपाशीला प्रतीनुसार कमीतकमी 7730 ते जास्तीत जास्त 8020 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. रविवारी मिळालेल्या कपाशीच्या सर्वाधिक दरात आज वाढ झाली आहे.
advertisement
कांद्याच्या दरात देखील वाढ
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज 1 लाख 76 हजार 655 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 53 हजार 530 क्विंटल सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 100 ते 3200 रुपये सर्वाधिक बाजार भाव मिळाला. रविवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे.
सोयाबीनच्या सर्वाधिक दरात वाढ
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज 54 हजार 449 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 14 हजार 171 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4170 ते 5100 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 हजार 800 क्विंटल सोयाबीनला कमीत कमी 3388 ते 5480 रुपये सर्वाधिक बाजार भाव मिळाला. रविवारी मिळालेल्या सोयाबीनच्या दरात आज वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
तुरीला 7688 रुपये सर्वाधिक दर
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज 8 हजार 166 क्विंटल तुरीची एकूण आवक झाली. यापैकी सोलापूर मार्केटमध्ये 1 हजार 654 क्विंटल लाल तुरीची आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 5667 ते 7007 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 63 क्विंटल काळ्या तुरीला 7688 रुपये सर्वाधिक बाजार भाव मिळाला. रविवारी मिळालेल्या तुरीच्या दरात आज काहीशी वाढ झालेली दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाढला सोयाबीनचा भाव, तूर आणि कापसाची स्थिती काय? Video
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement