Drishyam 3 Controversy: अक्षय खन्नाच्या एक्झिटवर अजय देवगणची पहिली रिॲक्शन, म्हणाला 'काय करायचं ते...'

Last Updated:
Drishyam 3 Controversy: 'दृश्यम ३' मधून अक्षयने ऐनवेळी एक्झिट घेतल्यामुळे निर्माते आधीच संतापले होते, पण आता खुद्द अजय देवगणची यावर काय भूमिका आहे, याचाही खुलासा झाला आहे.
1/9
मुंबई: 'धुरंधर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा आकडा काय गाठला, अक्षय खन्नाच्या वागण्यात जमीन-अस्मानाचा फरक पडल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
मुंबई: 'धुरंधर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा आकडा काय गाठला, अक्षय खन्नाच्या वागण्यात जमीन-अस्मानाचा फरक पडल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
advertisement
2/9
'दृश्यम ३' मधून अक्षयने ऐनवेळी एक्झिट घेतल्यामुळे निर्माते आधीच संतापले होते, पण आता या वादात चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी उडी घेतली असून खुद्द अजय देवगणची यावर काय भूमिका आहे, याचाही खुलासा केला आहे.

3/9
अभिषेक पाठकने अक्षय खन्नाच्या वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला,
अभिषेक पाठकने अक्षय खन्नाच्या वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, "सगळं काही ठरलं होतं. अक्षयला स्क्रिप्ट आवडली होती, लूक टेस्ट झाली होती आणि कपडेही फायनल झाले होते. पण 'धुरंधर' रिलीज व्हायच्या अवघ्या एक दिवस आधी त्याने चित्रपट सोडत असल्याचं सांगितलं."
advertisement
4/9
वादाचं मुख्य कारण हेअर विग असल्याचं समोर येतंय. अक्षयने चित्रपटात विग वापरण्याची मागणी केली होती. पण 'दृश्यम' हा सिक्वेल आहे, जिथे गोष्ट दुसऱ्या भागातून पुढे सरकते, त्यामुळे पात्राचा लूक बदलणं कथेला धरून नव्हतं.
वादाचं मुख्य कारण हेअर विग असल्याचं समोर येतंय. अक्षयने चित्रपटात विग वापरण्याची मागणी केली होती. पण 'दृश्यम' हा सिक्वेल आहे, जिथे गोष्ट दुसऱ्या भागातून पुढे सरकते, त्यामुळे पात्राचा लूक बदलणं कथेला धरून नव्हतं. "त्याचा विगचा हट्ट पूर्णपणे चुकीचा होता," असं दिग्दर्शकाने स्पष्ट केलं.
advertisement
5/9
अभिषेक पाठकचा संताप इतक्यावरच थांबला नाही. अक्षयच्या वाढलेल्या मानधनाच्या चर्चांवर त्याने सावध प्रतिक्रिया दिली असली, तरी त्याला एक चॅलेंज मात्र नक्की दिलंय.
अभिषेक पाठकचा संताप इतक्यावरच थांबला नाही. अक्षयच्या वाढलेल्या मानधनाच्या चर्चांवर त्याने सावध प्रतिक्रिया दिली असली, तरी त्याला एक चॅलेंज मात्र नक्की दिलंय.
advertisement
6/9
अभिषेक म्हणाला,
अभिषेक म्हणाला, "अक्षयने भविष्यात एखादा चित्रपट स्वतःच्या जिवावर हिट करून दाखवावा, मग आम्ही पाहू." अक्षयला केवळ साइड रोलमध्ये यश मिळालं आहे आणि त्याचा फायदा घेऊन तो निर्मात्यांना वेठीस धरतोय, असाच काहीसा सूर दिग्दर्शकाच्या बोलण्यातून जाणवत होता.
advertisement
7/9
या संपूर्ण वादावर चित्रपटाचा मुख्य चेहरा असलेल्या अजय देवगणची प्रतिक्रिया काय असेल, याची सर्वांना उत्सुकता होती. अभिषेक पाठकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यांनी या प्रकरणावर अजयशी चर्चा केली. पण अजयने आपल्या या वादापासून लांब राहणं पसंत केलं.

8/9
अजय म्हणाला,
अजय म्हणाला, "बघा, तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. हा तुमचा आणि निर्मात्यांचा विषय आहे." थोडक्यात काय, तर अजयने या वादात पडण्याऐवजी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. अजयच्या या शांत पण खंबीर भूमिकेमुळे आता अक्षय खन्नाची जागा दुसऱ्या कोणाला द्यायची, याचे मार्ग मोकळे झाले आहेत.
advertisement
9/9
एकीकडे अक्षय खन्नाचा वाद सुरू असला, तरी 'दृश्यम ३' च्या टीमने आपला वेग कमी केलेला नाही. नुकताच या चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला असून, २ ऑक्टोबर २०२६ ही तारीख प्रदर्शनासाठी लॉक करण्यात आली आहे. या फिल्ममध्ये आता अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावतची वर्णी लागल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement