Mumbai : 3 ओव्हरमध्ये 4 विकेट, लॉर्ड ठाकूरच्या बॉलिंगने आग ओकली, रोहितशिवाय मुंबईचा वादळी विजय

Last Updated:

विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईने छत्तीसगडचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली आहे. मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने नव्या बॉलने धमाका केला, त्यानंतर शम्स मुलानीच्या स्पिनची जादू चालली.

3 ओव्हरमध्ये 4 विकेट, लॉर्ड ठाकूरच्या बॉलिंगने आग ओकली, रोहितशिवाय मुंबईचा वादळी विजय
3 ओव्हरमध्ये 4 विकेट, लॉर्ड ठाकूरच्या बॉलिंगने आग ओकली, रोहितशिवाय मुंबईचा वादळी विजय
मुंबई : विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईने छत्तीसगडचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली आहे. मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने नव्या बॉलने धमाका केला, त्यानंतर शम्स मुलानीच्या स्पिनची जादू चालली, त्यामुळे छत्तीसगडचा 142 रनवर ऑलआऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 156 बॉल शिल्लक असतानाच केला. मुंबईने हा सामना 9 विकेटने जिंकला. याआधीच्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा मुंबईच्या टीममध्ये होता, पण छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात मुंबई रोहित शर्माशिवायच मैदानात उतरली.
या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर कर्णधार शार्दुल ठाकूरच्या बॉलने आग ओकली. फास्ट बॉलरना मदत करणाऱ्या या खेळपट्टीचा शार्दुलने पुरेपुर फायदा उचलला. पहिल्याच ओव्हरमध्ये शार्दुलने 2 विकेट घेतल्या, त्यानंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये त्याने आणखी 2 विकेट मिळवल्या, त्यामुळे छत्तीसगडची टॉप ऑर्डर कोसळली. शार्दुलने 3 ओव्हरमध्येच 4 विकेट घेतल्या होत्या, त्यामुळे छत्तीसगडचा स्कोअर पहिल्या 5 ओव्हरमध्ये 10 रनवर 4 विकेट असा होता.
advertisement

मुलानीच्या स्पिनसमोर लोटांगण

छत्तीसगडचा कर्णधार अमनदीप खरे (63 रन) आणि अजय मंडल (46 रन) यांनी पाचव्या विकेटसाठी 105 रनची पार्टनरशीप केली. पण त्यानंतर शम्स मुलानीच्या स्पिन बॉलिंगची जादू चालली, त्यामुळे छत्तीसगडचा 38.1 ओव्हरमध्येच 142 रनवर ऑलआऊट झाला. शम्स मुलानीने शेवटच्या 6 पैकी 5 विकेट घेतल्या. मुलानीला त्याच्या 5 विकेट 31 रन देऊन मिळाल्या. छत्तीसगडने त्यांच्या शेवटच्या 6 विकेट फक्त 27 रनमध्येच गमावल्या.
advertisement

अंककृष-सिद्धेशने मिळवून दिला विजय

या आव्हानाचा पाठलाग करताना अंगकृष रघुवंशी याने 66 बॉलमध्ये नाबाद 68 आणि सिद्धेश लाडने 42 बॉलमध्ये नाबाद 48 रन केले, या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 102 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे मुंबईने फक्त 24 ओव्हरमध्येच 9 विकेटने हा सामना जिंकला. इशान मुलचंदानीच्या रुपात मुंबईने एकमेव विकेट गमावली, जो 19 रनवर हर्ष यादवच्या बॉलिंगवर आऊट झाला. मुंबई 3 सामन्यांमध्ये 3 विजयांमुळे 12 पॉईंट्ससह ग्रुप सीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai : 3 ओव्हरमध्ये 4 विकेट, लॉर्ड ठाकूरच्या बॉलिंगने आग ओकली, रोहितशिवाय मुंबईचा वादळी विजय
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement