Alcohol Fact : दारू प्यायल्यावर लोक इमोशनल का होतात? EXला मेसेज, मित्रांसमोर रडणं का सुरु होतं? Psychology Explained
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी असा विचार केल्या का की दारू प्याल्यावर माणूस इतका इमोशनल का होतो? यामागे केवळ नशा नसून एक सखोल मानसशास्त्र (Psychology) आणि न्यूरोसायन्स (Neuroscience) दडलेले आहे.
advertisement
advertisement
मेंदूचा 'ब्रेक' फेल होतो (Loss of Inhibition)आपल्या मेंदूचा पुढचा भाग, ज्याला 'प्रीफ्रंटल कॉर्टेक्स' (Prefrontal Cortex) म्हणतात, तो आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवतो. आपण कोणाशी काय बोलावे, काय बोलू नये आणि त्याचे परिणाम काय होतील, हे ठरवण्याचे काम हा भाग करतो. जेव्हा अल्कोहोल मेंदूत पोहोचते, तेव्हा हा भाग मंदावतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्या मेंदूचा 'ब्रेक' फेल होतो. त्यामुळे मनात जे दबलेले विचार असतात, ते कोणत्याही फिल्टरशिवाय बाहेर येतात.
advertisement
डोपामाइनचा 'इमोशनल' डोसदारू प्याल्यामुळे मेंदूत 'डोपामाइन' (Dopamine) नावाच्या रसायनाची पातळी वाढते. याला 'फील गुड' हार्मोन म्हणतात. यामुळे तुम्हाला सुरुवातीला खूप आत्मविश्वास वाटू लागतो. याच आत्मविश्वासाच्या भरात तुम्हाला वाटते की, "आज तर मी बोलणारच!" आणि तुम्ही ते पाऊल उचलता जो एरवी तुम्ही कधीच उचलला नसता.
advertisement
'अल्कोहोल मायोपिया' (Alcohol Myopia)मानसशास्त्रात याला 'अल्कोहोल मायोपिया' म्हणतात. दारू पिल्यावर माणसाची विचार करण्याची दृष्टी मर्यादित होते. त्याला भविष्यातील परिणामांची (उदा. उद्या नातं खराब होईल किंवा इज्जत जाईल) भीती वाटत नाही. त्याला फक्त 'सध्याचा क्षण' आणि 'सध्याची भावना' महत्त्वाची वाटते. जर त्या क्षणी तुम्हाला कोणाची आठवण आली, तर तुमचा मेंदू इतर सर्व तर्क बाजूला सारून फक्त त्या आठवणीवर लक्ष केंद्रित करतो.
advertisement
advertisement
तज्ज्ञ काय म्हणतात?प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांच्या मते, दारू माणसाला नवीन विचार देत नाही, तर आधीपासूनच मनात असलेल्या विचारांना वाट करून देते. दारूच्या नशेत केलेली कृत्ये ही तुमच्या अंतर्मनातील दबलेल्या इच्छा असू शकतात. 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अब्युज' (NIAAA) नुसार, अल्कोहोल मेंदूच्या त्या भागावर परिणाम करते जो तर्कसंगत विचार आणि भावनांचे नियमन करतो.
advertisement
हे टाळण्यासाठी काय करावे?१. फोन दूर ठेवा: दारू पिण्यापूर्वी आपला फोन विश्वासू मित्राकडे द्या किंवा लॉकरमध्ये ठेवा.२. इंटरनेट बंद करा: वाय-फाय किंवा डेटा बंद केल्यास मेसेज जाण्याची शक्यता कमी होते.३. विशिष्ट ॲप्स: प्ले स्टोअरवर 'Drunk Mode' सारखे ॲप्स उपलब्ध आहेत जे नशेत असताना काही ठराविक नंबर ब्लॉक करतात.
advertisement










