VIDEO : लग्नाची धूम, जळगावात हातात पिस्तूल, दहशत माजवणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल; मोठी खळबळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लग्नसमारंभात एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल हातात घेऊन बेधडकपणे नाचल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. लग्नसमारंभात एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल हातात घेऊन बेधडकपणे नाचल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान हातात पिस्तूल घेऊन नाचताना स्पष्टपणे दिसत आहे. गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे शस्त्राचे प्रदर्शन करणे अ़तिशय गंभीर प्रकार असून, यामुळे संभाव्य अनुचित घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित पिस्तूल खरी आहे की बनावट, तसेच त्या व्यक्तीकडे वैध शस्त्र परवाना आहे की नाही, याची तातडीने चौकशी व्हावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे.
advertisement
या प्रकरणी दीपककुमार गुप्ता यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्र बाळगणे आणि त्याचा गैरवापर करणे हे गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपात मोडते. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.
advertisement
पिस्तूल हातात घेऊन नाचणारी व्यक्ती बाहेरील गावची
प्राथमिक माहितीनुसार, पिस्तूल हातात घेऊन नाचणारी व्यक्ती जळगाव जिल्ह्यातील नसून बाहेरील जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण आहे, ती धरणगावमध्ये कशासाठी आली होती, तसेच तिला शस्त्र कसे मिळाले, याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दोषी आढळल्यास कठोर कारवाई
advertisement
दरम्यान, धरणगाव पोलिसांनी या व्हिडिओची पुष्टी केली असून व्हिडिओच्या आधारे तपास सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पिस्तूलची सत्यता आणि परवान्याबाबत चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 9:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : लग्नाची धूम, जळगावात हातात पिस्तूल, दहशत माजवणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल; मोठी खळबळ










