Thyroid : थायरॉईडची लक्षणं ओळखा, वेळेत उपचार घ्या, व्याधीवर नियंत्रण मिळवा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
थायरॉईडच्या लक्षणांविषयीची ही माहिती नक्की वाचा कारण थकवा किंवा ताण आल्यानंही अशी लक्षणं जाणवू शकतात. पण, या दुर्लक्षामुळे नंतर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. लक्षणं लवकर ओळखली गेली तर उपचार सोपे होतात. थायरॉईडच्या मुख्य लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
मुंबई : थायरॉईडचं प्रमाण वाढतंय पण ही समस्या आता केवळ महिलांपुरती मर्यादित नाही, तर पुरुषांमधेही याचं प्रमाण वेगानं वाढतंय. या विकारामुळे, हळूहळू शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो.
थायरॉईडच्या लक्षणांविषयीची ही माहिती नक्की वाचा कारण थकवा किंवा ताण आल्यानंही अशी लक्षणं जाणवू शकतात. पण, या दुर्लक्षामुळे नंतर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. लक्षणं लवकर ओळखली गेली तर उपचार सोपे होतात. थायरॉईडच्या मुख्य लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
वजन अचानक वाढू लागलं किंवा खूप बारीक होऊ लागलात तर हे थायरॉईडचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. लवकर उपचार घेणं ही यातली पहिली पायरी आहे.
advertisement
थकवा आणि अशक्तपणा - थकवा आणि अशक्तपणा ही थायरॉईड आजाराची मुख्य लक्षणं आहेत. पुरेशी झोप घेतल्यानंतरही जर सुस्ती वाटत असेल आणि ऊर्जा कमी वाटत असेल, तर हे थायरॉईड संप्रेरकाच्या असंतुलनाचे संकेत असू शकतात.
हृदयाचे जलद किंवा मंद ठोके - हृदय वेगानं धडधडू लागलं किंवा कोणतंही ठोस कारण नसताना हृदयाचा वेग मंदावणं ही थायरॉईडची गंभीर लक्षण असू शकतात.
advertisement
मूड स्विंग्स आणि नैराश्य - थायरॉईडच्या समस्या वाढत असताना, वारंवार चिडचीड, चिंता किंवा नैराश्य येऊ शकतं. लोक अनेकदा याला मानसिक ताण समजतात.
केस गळणं आणि त्वचा कोरडी होणं - थायरॉईडची समस्या असलेल्यांना अचानक केस गळणं आणि भुवयांचे केस पातळ होणं असे अनुभव येऊ शकतात. त्वचा कोरडी आणि निर्जीव देखील दिसू शकते. ही लक्षणं दिसली तर ताबडतोब चाचणी करून घ्या.
advertisement
थंडी किंवा उष्णता सहन न होणं - थायरॉईडच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे शरीराचं तापमान वाढणं किंवा कमी होणं. अति थंडीत किंवा उष्णता जास्त नसतानाही घाम येणंही सुरू होऊ शकतं. यामुळे चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो.
मासिक पाळी आणि प्रजननात समस्या - थायरॉईडच्या समस्यांमुळे महिलांमधे मासिक पाळी अनियमित होणं, जास्त किंवा अपुरा रक्तस्त्राव आणि प्रजनन समस्या उद्भवू शकतात. पुरुषांमधेही हार्मोनल असंतुलन होऊ शकतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 8:31 PM IST











